आजचा वाढदिवस : हेमंत पाटील, आमदार, नांदेड दक्षिण विधानसभा.  - hemant patil mla | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस : हेमंत पाटील, आमदार, नांदेड दक्षिण विधानसभा. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 डिसेंबर 2017

विद्यार्थी दशेपासून सामाजिक आणि राजकीय चळवळीत काम करणाऱ्या हेमंत पाटील यांचा शिवसेनेचा शाखाप्रमुख ते आमदार असा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. नांदेडला युवा सेना तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नांदेड महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी स्थायी समितीचे सभापतिपदीही भूषविले. 2009 मध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली मात्र त्यांना पराभूत व्हावे लागले. नंतर त्यांनी 2014 मध्ये निवडणूक लढविली आणि आमदार झाले. सलग गेल्या 11 वर्षापासून ते आषाढी महोत्सवाचे आयोजन करत आहेत.

विद्यार्थी दशेपासून सामाजिक आणि राजकीय चळवळीत काम करणाऱ्या हेमंत पाटील यांचा शिवसेनेचा शाखाप्रमुख ते आमदार असा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. नांदेडला युवा सेना तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नांदेड महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी स्थायी समितीचे सभापतिपदीही भूषविले. 2009 मध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली मात्र त्यांना पराभूत व्हावे लागले. नंतर त्यांनी 2014 मध्ये निवडणूक लढविली आणि आमदार झाले. सलग गेल्या 11 वर्षापासून ते आषाढी महोत्सवाचे आयोजन करत आहेत. त्याचबरोबर नांदेड शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी माझं शहर, देखणं शहर हा उपक्रम राबवून शहरातील विद्रूप झालेल्या भिंती देखण्या केल्या. मागील दहा वर्षापासून विष्णुपुरी प्रकल्पाचा 25 कोटी वीज देयकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. 2013 मध्ये गोदावरी अर्बन बॅंक सुरू केली तसेच गोदावरी पब्लिक स्कूलची स्थापना केली. ग्रामीण भागातील शाळांमध्ये अनवाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मी अनवाणी ही योजना सुरू करून जवळपास हजार विद्यार्थ्यांना बूट व पायमोजांचे वाटप केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख