'मनसे'तून आलेले हेमंत गायकवाड निष्ठावंतांना मागे टाकत बनले भाजपचे मंडल अध्यक्ष 

भारतीय जनता पक्षाच्या नाशिक रोड मंडल अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला. यासाठी निष्ठावंतात मोठी स्पर्धा होती. मात्र, या बारा निष्ठावंतांना मागे टाकत मनसेतून आलेले बांधकाम व्यावसायिक हेमंत गायकवाड अध्यक्षपद मिळवण्यात यशस्वी झाले
Hemant Gaikwad Becomes BJP Nashik Road President
Hemant Gaikwad Becomes BJP Nashik Road President

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या नाशिक रोड मंडल अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला. यासाठी निष्ठावंतात मोठी स्पर्धा होती. मात्र, या बारा निष्ठावंतांना मागे टाकत 'मनसे'तून आलेले बांधकाम व्यावसायिक हेमंत गायकवाड अध्यक्षपद मिळवण्यात यशस्वी झाले.

या पदासाठी पक्षाचे विविध पदाधिकारी इच्छुक होते. त्यामुळे ही नियुक्ती लाभली होती. विशेषतः आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांताराम घंटे राजेश आढाव, सतीश रत्नपारखी, योगेश हांडे, नवनाथ ढगे, मंगेश पगार, विजय लोखंडे, बापू सहापूते, रामदास गांगुर्डे, विजय देशमुख, संजय शिरसाठ आदी बारा इच्छुक होते. यासंदर्भात नगरसेवक संभाजी भास्कर व बाजीराव भागवत यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन गायकवाड यांना विरोध करून पक्षाच्या निष्ठावंतांतून निवड करण्याची सूचना केली होती. 

काल सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या नाशिक रोड  मंडलाच्या अध्यक्ष हेमंत दत्तात्रय गायकवाड यांची निवड करण्यात आली. इच्छुकांची समजूत काढण्यात आली. चर्चा होऊन हेमंत गायकवाड  यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन सर्वानुमते त्यांची मंडल अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक अधिकारी  म्हणून जगन अण्णा पाटील  यांनी काम पाहीले.  

या वेळी झालेल्या कार्यक्रमात शहराध्यक्ष गिरीष पालवे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल ,प्रदेश प्रवक्ते सुहास फरांदे भाजप प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, सचिन हांडगे ,बाजीराव भागवत , अंबादास पगारे,जगन पाटील ,योगेश भगत,शांताराम घंटे किरण मैद ,संजीव रत्नपारखी ,संजय शिरसाठ आदी हजर होते. निवड झाल्यानंतर मंडळ अध्यक्ष हेमंत दत्तात्रय गायकवाड यांचा प्रदेश भाजप उपाध्यक्ष सुनील बागुल, भाजप नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. निवड झाल्यानंतर गायकवाड यांचे निवडीचे भाजप शहर पदाधिकारी व नाशिक रोड पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार व जल्लोषात स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com