सांगा कोण जिंकणार ? हेमा मालिनी याच्याविरुद्ध नृत्यांगना सपना चौधरी

 सांगा कोण जिंकणार ? हेमा मालिनी याच्याविरुद्ध नृत्यांगना सपना चौधरी

मथुरा : मथुरा मतदार संघातून भाजपकडून लढणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविरोधात कॉंग्रेस हरियाणाच्या प्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे.चौधरी यांना जर रिंगणात उतरवले तर निवडणूक रंगतदार होईल अशी चर्चा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. 

याबाबत सूत्राकडून समजलेली माहिती अशी की, नृत्यांगना सपना चौधरी कॉंग्रेस पक्षाच्या संपर्कात असून सपनाने काही नेत्यांशी चर्चा केली आहे. सपनाने मथुरा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सपनाचा उत्तर भारतात मोठा चाहता वर्ग आहे, त्याशिवाय देशभर तिचे चाहते आहेत. तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. हेमा मालिनी या प्रसिद्ध चित्रपट अभीनेत्री असून त्यांनी चार दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेले आहे. त्या भाजपच्या स्टार कॅम्पेनरही आहेत. हेमा मालिनी आणि सपना चौधरी यांच्यात निवडणुकीचा सामना झाला तर निवडणूक चुरशीची होईल आणि देशाचे लक्ष वेधून घेईल असे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com