मंत्री थोरातांच्या मदतीमुळे आदित्यला मिळाली दृष्टी

 With the help of Minister Thorat Aditya got the vision
With the help of Minister Thorat Aditya got the vision

संगमनेर ः चुन्याच्या कारखान्यात अचानक झालेल्या स्फोटाच्या तडाख्यात वडिलांसोबत गेलेल्या चिमुरड्या आदित्यला अंधत्त्व
आले. त्याच्या उपचारासाठी चाचपडणाऱ्या माता-पित्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रूपाने मदतीचा मोठा हात मिळाला. आणि तब्बल सहा वर्षांनंतर आदित्य पुन्हा जग पाहण्यास मिळाले.

संगमनेर तालुक्‍याच्या पूर्व भागातील पिंप्री लौकी अजमपूर येथील ही घटना. साधारण नऊ वर्षांपूर्वी घरगुती कारखान्यात चुन्याचे काम करणारे वडील दत्तात्रेय माळी यांच्यासोबत त्यांचा सहा वर्षांचा मुलगा आदित्य गेला होता. त्यांच्या कामात त्याची लुडबूड सुरू होती. त्याच वेळी अचानक भीषण स्फोट झाला. आदित्यच्या डोळ्यात चुना गेला नि त्याला कायमचे अंधत्व आले. या दुर्घटनेमुळे हादरलेल्या माळी कुटुंबीयांनी ठिकठिकाणी चाचण्या, उपचार केले. मात्र, त्यात यश आले नाही. 

माळी कुटुंबाची धडपड पाहून भीमा राहिंज, बाळकृष्ण दातीर, अण्णा राहिंज, गणपत सांगळे आदी कार्यकर्ते व स्वीय सहायक विजय हिंगे यांनी दत्तात्रेय माळी यांची मंत्री थोरात यांच्याशी भेट घडवून आणली. त्यांची हकिकत ऐकून, थोरात यांनी शिरूर येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्नील भालेकर यांना फोन केला. माळी कुटुंबास मदत करण्यास सांगितले. महिनाभरापूर्वी आदित्यच्या डोळ्यावर किचकट शस्त्रक्रिया करण्यात आली. अखेर तो दिवस आला. आदित्यला त्याची दृष्टी पूर्ववत मिळाली. त्यासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाची तरतूद मंत्री थोरात यांनी केली. 

आदित्यला घेऊन आज त्याच्या कुटुंबीयांनी मंत्री थोरात यांची भेट घेतली. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. या मदतीमुळे आयुष्यात अंधःकार पसरलेल्या आदित्यच्या किशोरवयीन जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश निर्माण झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com