रात्रीच्या दुष्काळ आढावा बैठकीत गिरीष महाजन व माजी उपसभापतींत तू तू- मैं मैं! 

नाशिक जिल्ह्यात तीव्र स्वरुपाच्या दुष्काळाची चिन्हे आहेत. अनेक भागात शेतीला, पिण्याला पाण्याची मोठी टंचाई आहे. त्यासाठी पालकमंत्री महाजन यांनी काल सकाळी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मतदारसंघातील देवळा येथुन दौऱ्याला सुरवात केली. बांधावर जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंत्री आल्याने नागरिकही त्यांना विविध भागात घेऊन जात होते.
रात्रीच्या दुष्काळ आढावा बैठकीत गिरीष महाजन व माजी उपसभापतींत तू तू- मैं मैं! 

नांदगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चार महिन्यांनी नाशिकच्या दुष्काळी दौऱ्यासाठी सवड काढली. पण दुष्काळाच्या बैठकीसाठी दुपारी दोनला नांदगावला येणारे गिरीश महाजन रात्री आठला पोहचले. बैठक साडे नऊला संपली. अधिकारी, लोकप्रतिनिधी मध्यरात्रीपर्यंत अडकले. विशेष म्हणजे यामध्ये मधुमेहाचा त्रास असलेल्या अनेक नेत्यांना रात्री जेवायलाही न मिळाल्याने हा दुष्काळी दौरा चांगलाच चर्चेत राहिला. 

नाशिक जिल्ह्यात तीव्र स्वरुपाच्या दुष्काळाची चिन्हे आहेत. अनेक भागात शेतीला, पिण्याला पाण्याची मोठी टंचाई आहे. त्यासाठी पालकमंत्री महाजन यांनी काल सकाळी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मतदारसंघातील देवळा येथुन दौऱ्याला सुरवात केली. बांधावर जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंत्री आल्याने नागरिकही त्यांना विविध भागात घेऊन जात होते. पालकमंत्र्यांनीही त्यांना नाराज केले नाही. देवळा, सटाणा यांसह विविध भागांचा दौरा करतांना ते दुपारी नांदगावला येतील असा निरोप होता. 

त्यामुळे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार पंकज भुजबळ, सुहास कांदे असे अनेक नेते त्यांची प्रतिक्षा करीत होते. परंतु, नांदगावला जातानाही लोक त्यांनी शिवारात घेऊन जात होते. त्यामुळे नांदगावला पोहोचण्यास त्यांना रात्रीचे पावणे आठ वाजले. मात्र, दिवसभराची दगदग झाल्यावरही त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. त्यांनी नांदगावला बैठक घेतली. 

या दरम्यान आढावा बैठकीसाठी मंत्र्यांना अंमळ उशीर होऊ लागल्याने तिष्ठत बसलेल्या यंत्रणेतील वर्तुळातूनच दौरा स्थगित झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या चर्चेमुळे संभ्रमाचे वातावरण झाले होते. अधिकाऱ्यांच्या माहितीचा हवाला देत पालकमंत्र्यांचा दौरा स्थगित झाल्याच्या उलटसुलट चर्चेने आढावा बैठकीसाठी मोठ्या उमेदीने आलेल्या उपस्थितांचा मात्र गोंधळ उडत होता. त्यामुळे नेते, अधिकारी, कार्यकर्त्यांत चुळबुळ सुरु झाली. रात्री बैठक सुरु झाल्यावर प्रातिनिधिक स्वरूपात दुष्काळाचे चित्र मांडण्यात आले. 

त्यातच पालकमंत्र्यांचे भाषण सुरु असतांना माजी उपसभापती सुभाष कुटे यांनी "दुष्काळ कधी जाहीर करता?,'' असे महाजन यांना विचारले. त्यावर महाजन यांनी "राजकारण कशाला करता? तुम्हाला ऐकण्याचे नसेल तर मी थांबतो," असे त्यांना खडसावले. त्यावर कुटे यांनी "केवळ घोषणा नकोत. धोरणात्मक निर्णय घ्यावा.''असा आग्रह धरला. त्यावरुन दोघांमध्ये काही काळ खडाजंगी झाली. बैठक संपल्यानंतरही उपस्थितांमध्ये याच खडाजंगीचीच चर्चा होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com