...आणि हृदयशस्त्रक्रिया झालेली दहा महिन्यांची रुहानीका जयसिंगपूरला सुखरूप पोहचली!

संचारबंदी लागू झाली आणि सर्व प्रकारची वाहने व रस्ते बंद झाले. दवाखान्यात माळी यांना काही कळेनासे झाले, डिस्चार्ज घेऊन जायचं कुठं, मुंबईत कोणी नातेवाईक नाहीत, अथवा राहायची कोणतीही सोय नाही, आर्थिक प्रश्न सुद्धा मोठा होता.
health state minister rajendra patil yadrawkar helps mali family
health state minister rajendra patil yadrawkar helps mali family

जयसिंगपूर (कोल्हापूर) : आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यामुळे हृदयशस्त्रक्रिया झालेली दहा महिन्यांची रुहानीका माळी ही मुलगी मुंबईहून जयसिंगपूरला सुखरूप घरी पोहचली.

जयसिंगपूर लक्ष्मी मंदिर शाहूनगर येथे रहात असलेल्या रोहन जयराज माळी यांची दहा महिन्याची मुलगी कुमारी रुहानीका माळी मुंबई येथील रिलायन्स'च्या कोकिळाबेन हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होती, तिच्या हृदयाला होल असल्यामुळे नुकतीच तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती, शस्त्रक्रिया यशस्वी झाली, काही दिवस तिला रुग्णालयात ठेवून घेतले. तिला डिस्चार्ज मिळाला आणि इकडे कोरोना च्या वातावरणामुळे महाराष्ट्रासह देश लॉकडाऊन झाला.

संचारबंदी लागू झाली आणि सर्व प्रकारची वाहने व रस्ते बंद झाले. दवाखान्यात माळी यांना काही कळेनासे झाले, डिस्चार्ज घेऊन जायचं कुठं, मुंबईत कोणी नातेवाईक नाहीत, अथवा राहायची कोणतीही सोय नाही, आर्थिक प्रश्न सुद्धा मोठा होता, अशा काळात गावी जयसिंगपूरला येण्या खेरीज कोणताच पर्याय नव्हता, त्यामुळे श्री माळी यांनी नगरसेवक अस्लम फरास यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर त्यांनी आणि उपनगराध्यक्ष श्री. संजय पाटील-यड्रावकर यांनी ही बाब राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कानावर घातली. आणि मग मंत्री यड्रावकर यांनी तातडीने हालचाली करत मुंबईमधील आपल्या स्टाफला संबंधित मुलीला त्यांच्या पालकांसह जयसिंगपूर मध्ये पोहोच करण्याचे आदेश दिले. अवघी दहा महिन्याची रुहानीका माळी आपल्या पालकांसह कोणताही खर्च न करता जयसिंगपूर मधल्या आपल्या घरी सुखरूप दाखल झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com