नगरमध्ये अधिकाऱ्यांच्या पाठिवर आरोग्यमंत्री टोपे यांची काैतुकाची थाप

राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. कोविड केअर सेंटरची व्यवस्था, ते कार्यान्वित झालेत का, आदींबाबत त्यांनी विचारपूस केली.
rajesh tope
rajesh tope

नगर : ``कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. नगर जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस विभागाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण रुग्णांपर्यंत पोहोचू शकलो,`` अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकाऱ्यांचे काैतुक केले. 

औरंगाबादहून मुंबईकडे जाताना टोपे नगरमध्ये थांबले होते. येथेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला. या वेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महानगर पालिका आयुक्त श्रीकांत म्याकलवार, राज्य वैद्यकीय पथकाच्या सदस्य डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरांबिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

टोपे यांनी आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोणत्या भागात किती रुग्ण आढळून आले, सध्याची परिस्थिती, औषधांची उपलब्धता आदीबाबत त्यांनी माहिती घेतली. कोविड केअर सेंटरची व्यवस्था, ते कार्यान्वित झालेत का, आदींबाबत त्यांनी विचारपूस केली. आपत्ती व्यवस्थापन निधी, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि सीएसआर निधीतून आरोग्य सुविधा बळकटीकरण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात सध्या सुरू असलेले कंटेटमेंट झोन, तेथील परिस्थिती याची माहितीही त्यांनी घेतली. 

ते म्हणाले की, या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्वाचे आहे.
नवीन रुग्णांची भर पडणार नाही. यासाठी कंटेटमेंट झोन भागात कडकपणे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com