उदयनराजेंच्या मंत्रिपदासाठी त्याने लिहिले रक्ताने पत्र!

blood-letter for udaynraje
blood-letter for udaynraje

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्यावर प्रेम करणारा बोंडारवाडी (ता. सातारा) येथील युवक नीलेश सूर्यकांत जाधव याने स्वतःच्या रक्ताने उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रीपद मिळावे, ही मागणी करणारे पत्र लिहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे.

नीलेशचे हे पत्र आज सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देवून भाजपाच्या तिकीटावर सातारा लोकसभा लढली. त्यांचा माजी राज्यपाल व राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील यांनी पराभव  केला. सद्या उदयनराजे भोसले यांना भाजपकडून या पराभवाची भरपाई होणार का याची उत्सुकता आहे.

उदयनराजे यांच्यावर प्रेम करणारे जिल्ह्यात तसेच राज्यात आणि देशात अनेक तरुण कार्यकर्ते आहेत. या सर्वांना उदयनराजे पुन्हा खासदार आणि केंद्रात मंत्री झालेले पहायचे आहे. असाच एक बोंडारवाडी येथील नीलेश जाधव हा त्यांच्यावर प्रेम करणारा तरुण तेज ग्रुपमध्ये कामाला आहे. नीलेश मुंबईत कामानिमित्त गेला होता. आज त्याचा वाढदिवस असल्याने वाढदिवसानिमित्ताने सकाळीच तो उदयनराजेंसाठी थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहायला बसला. त्याने पत्र
लिहिले अन् त्याने ते पाठविलेही!

त्यानंतर हे पत्र दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. पत्रात त्याने म्हंटले की, आमच्या घरी माझ्या आजोंबापासून छत्रपती उदयनराजे भोसले व त्यांच्या कुटुंबांवर आमचे प्रेम आहे. माझेही राजेंवर खूप प्रेम आहे. उदयनराजेंना केंद्रात मंत्रीपद मिळावे अशी माझी इच्छा आहे. ती  मी माझ्या रक्ताने मांडली आहे, असे त्याने लिहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com