HC rejects anticipatory bail to gautam navlakha and anand teltumbade | Sarkarnama

गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांना दिलासा नाही  

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले विचारवंत गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यांनी केलेले अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले.

मुंबई ः शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले विचारवंत गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यांनी केलेले अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले.

पुणे पोलिसांनी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव विजय दिनी झालेल्या हिंसाचाराबाबत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात अटक होण्याच्या शक्‍यतेने दोघांनीही उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. न्या. प्रकाश नाईक यांनी त्या अर्जांवर शुक्रवारी निकालपत्र जाहीर केले. न्यायालयाने नवलखा आणि तेलतुंबडे यांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला आहे; परंतु या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी नवलखा आणि तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत मंजूर केली. त्यामुळे या दोघांची अटक चार आठवडे अटक टळली आहे. 

नवलखा आणि तेलतुंबडे यांचे नक्षलवाद्यांशी व एल्गार परिषदेशीही संबंध असल्याबाबत पुरेसे सबळ पुरावे आहेत, असा दावा करत राज्य सरकारने जामिनाला विरोध केला होता; परंतु संबंधित पुरावे थेट नसून, अन्य आरोपींच्या जबानीतील आहेत. त्याचप्रमाणे सरकारचा सहभाग असलेल्या शांतिचर्चेच्या प्रक्रियेतच संबंधितांशी बोलणी केल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. 

या संदर्भात पुणे पोलिसांनी अद्याप ठोस पुरावे दाखल केलेले नाहीत; त्यामुळे आपल्याला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा त्यांचा दावा आहे. भिमा कोरेगाव येथे जानेवारी 2018 मध्ये हिंसाचार झाला होता.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख