आमदार तोडसामांच्या पहिल्या पत्नीसह केंद्र सरकारने उत्तर द्यावे : हायकोर्ट 

आमदार तोडसामांच्या पहिल्या पत्नीसह केंद्र सरकारने उत्तर द्यावे : हायकोर्ट 

नागपूर : यवतमाळ जिल्याच्या आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये झालेल्या भांडणाप्रकरणी नागपूर खंडपीठाने गुगल, यूटयूब आणि फेसबुक यांना नोटीस मिळाली असल्याचे ग्राह्य मानून केंद्र सरकारसह पहीली पत्नी अर्चना तोडसाम यांना तीन आठवडयात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान पांढरकवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत 12 फेब्रुवारी रोजी आमदार राजू तोडसाम यांच्या पहिल्या पत्नी अर्चना व दुसरी पत्नी प्रिया यांच्यात भांडण झाले. एक कार्यक्रम आटोपून घरी परतताना पांढरकवड्याच्या वाय पॉईंटवर प्रिया तोडसाम यांच्या गाडीने त्यांना धक्का दिला. जाब विचारल्यावर प्रिया खाली उतरल्या व शिविगाळ केली. तसेच, झापड मारून जातीवाचक शिव्याही दिल्या, अशी तक्रार तोडसाम यांच्या पहिल्या पत्नी अर्चना यांनी 16 मार्चला दाखल केली होती.

घडलेल्या या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी सोशल साईट्‌नी त्याची शहानिशा केली नाही. त्यामुळे, युट्‌यूब व गुगलचे धोरण काय आहे, याची केंद्र सरकारने योग्य चौकशी करावी आणि सोशल मिडियावरील व्हिडोओ ब्लॉक करावा, अशी विनंतीही याचिकेमार्फत केली होती. याप्रकरणी मागील सुनावणीत हायकोर्टाने प्रतिवादींना नोटीस बजावली होती. 

मात्र, गुगल, यूटयूब आणि फेसबुक यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. त्यामुळे, न्या. प्रदीप देशमुख आणि न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी प्रतिवादींना नोटीस मिळाली असे ग्राह्य धरले आहे. दरम्यान प्रिया यांच्यावर विविध कलमांसह ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे रद्द करून सीबीआय व सीआयडीकडे तपास द्यावा, अशी विनंती त्यांनी केली होती. घटनास्थळावरील प्रकार काही लोकांनी आणि वाहिन्यांनी कॅमेरात टिपला व त्याचा व्हिडियो युट्‌यूबवरून व्हायरल केला. गुगल आणि फेसबुकवरदेखील तो उपलब्ध झाला. त्यामुळे याचिकेत या तिन्ही साईट्‌सला प्रतिवादी करण्यात आले आहे. यापूर्वी, हायकोर्टाने प्रिया यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करू नये, असे आदेश दिले होते. प्रिया तोडसामतर्फे ऍड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com