`हवेलीतील 600 कोटींच्या कामांमुळे शिवतारेंना 35 हजाराचे लीड`

`हवेलीतील 600 कोटींच्या कामांमुळे शिवतारेंना 35 हजाराचे लीड`

सासवड, ता. 13 :  पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघातील हवेली तालुक्यातून राज्यमंत्री तथा महाआघाडीचे उमेदवार विजय शिवतारे यांना ३५ हजारांचे मताधिक्य देणार असल्याची ग्वाही जि. प.चे माजी अध्यक्ष व भाजप नेते जालिंदर कामठे आणि हवेली तालुका शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे यांनी दिली आहे.

शिवसेना, भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार शिवतारे यांच्या प्रचारार्थ महायुतीतर्फे आज फुरसुंगी, भेकराईनगर, गंगानगर व परिसरात प्रचाररॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

यावेळी शिवतारे म्हणाले, ``पुरंदर आणि हवेली तालुक्यात विरोधक ज्या रस्त्यांवरून गावं पिंजून काढत आहेत. तो प्रत्येक रस्ता आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळे विकासाबाबत प्रश्न विचारताना त्यांनी आधी या गोष्टीचा विचार करावा. कॉंग्रेसच्या ७० वर्षाच्या सत्ताकाळात जी कामे होऊ शकली नाहीत, ती महायुतीने अवघ्या ५ वर्षात केलेली आहेत. कचरा कॅपिंग, फुरसुंगी उरुळी देवाची पाणीयोजना, मंतरवाडी खडीमशीन चौक रस्ता, फुरसुंगी वडकी रस्ता, भेकराईनगर ते फुरसुंगी रस्ता, फुरसुंगी मांजरी रस्ता, भेकराई, ढमाळवाडी, पापडेवस्तीमधील सर्व कॉक्रीट रस्ते. अशी जवळपास ६०० कोटींची कामे आपण या परिसरात करू शकलो. त्यामुळे हवेलीतून धनुष्यबाणाला प्रचंड मताधिक्य मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.``

यावेळी जि.प चे माजी सदस्य बाजीराव सायकर, सेनेचे उपतालुकाप्रमुख कैलास ढोरे, हवेली भाजपा सरचिटणीस धनंजय कामठे, राहुल शेवाळे, हवेली कार्याध्यक्ष नितीन जांभळे, भाजप किसान मोर्चाचे केशव कामठे, पं.स.सदस्य अनिल टिळेकर, किशोर पोकळे, उपजिल्हाप्रमुख अमोल हरपळे, संतोष हरपळे, गणपत दगडे, संदिप हरपळे, विजय हरपळे, चकीत देशमुख, जितेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर कामठे, राजू चंद, तानाजी कामठे, गणेश कामठे, महेश हरपळे, नितीन गावडे, रुपेश मोरे, सतीश जगताप, विठ्ठल कामठे, नागेश हरपळे, केशव सायकर, धनंजय हरपळे, अक्षय कामठे, जितेंद्र कामठे, नितीन कामठे, सुजित थेवरे, राहुल पवार, शादाब मुलाणी, निर्मला मेमाणे, उषा ढोरे, महिला आघाडीच्या सविता ढवळे, विजया भारती, आशा कांबळे, बाळकृष्ण कामठे, बाळासाहेब हरपळे, निलेश पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 
-------------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com