hatkangale and raju shetty | Sarkarnama

महादेवराव महाडिक- धैर्यशील माने भेटीने चर्चेला उधाण

सागर कुंभार
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर / रुकडी : अखिल भारतीय राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा व माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चेला उधाण आले आहे. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादीने खासदार राजू शेट्टींसोबत आघाडी करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये प्रकाशराव आवाडे गटाने त्यांना उघड पाठिंबा दिला आहे. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील हे देखील खासदार शेट्टी यांच्यासोबत विविध कार्यक्रमात दिसत आहेत. त्यामुळे महाडिक हे शेट्टी यांच्या विरोधात राहतील असा अंदाज आहे. खासदार राजू शेट्टी यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याचा इशारा माने गटाने दिला आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदार संघात सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज महाडिक व माने यांची भेट झाली. महाडिक हे दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मात्र खासदार बाळासाहेब मानेंच्या निधनानंतर परिस्थितीनुरुप राजकीय समीकरणांत बदल होत गेले. त्यामुळे या दोन्ही गटात अंतर वाढत गेले. लोकसभेच्या तोंडावर दोघांनी एकत्र येत बंद खोलीत केलेल्या चर्चेने राजकीय क्षेत्रात उलट- सुलट चर्चेला उधान आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख