एक गडी आणि बारा भानगडी! 

लॉकडाऊनमुळे हाताखाली काम करणारे स्विय्य सहाय्यक नाहीत, त्यामुळे स्वतःच फोन लावणे, त्याचा पाठपुरावा करणे ही कामे त्यांना करावी लागत आहेत.
hatkanangale constituency representative dhairysheel mane works from home
hatkanangale constituency representative dhairysheel mane works from home

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने राहातात कोल्हापूर शहरातील रूईकर कॉलनी परिसरात आणि त्यांचा मतदार संघ आहे घरापासून 20 किलोमीटर अंतरावर. त्यात त्यांच्या मतदार संघात येणाऱ्या इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जण कोरोनाचे पॉझीटीव्ह रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे, पण लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडता येत नाही, दुसरीकडे मतदार संघातून कार्यकर्त्यांचे मदतीसाठी फोन येतात अशा परिस्थितीत खासदार माने यांनी घरातूनच यंत्रणेशी संपर्क साधून हवी ती मदत पोहचवण्यास सुरूवात केली आहे.

'एक गडी आणि बारा भानगडी' असे त्यांच्या मदतीचे स्वरूप आहे. लॉकडाऊनमुळे हाताखाली काम करणारे स्विय्य सहाय्यक नाहीत, त्यामुळे स्वतःच फोन लावणे, त्याचा पाठपुरावा करणे ही कामे त्यांना करावी लागत आहेत. रोज सकाळी सहा वाजताच त्यांचा दिनक्रम सुरू होतो तो कार्यकर्त्यांच्या मागणीच्या फोनने. त्यानंतर दुपारपर्यंत त्यांचा दिवस कार्यालयातच जातो. दरम्यानच्या मुदतीत कोल्हापूरबरोबरच सांगलीचे जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी, मतदार संघातील इतर अधिकाऱ्यांशी फोनवरून आवश्‍यक त्या सुचना देण्यात त्यांचा वेळ जात आहे. घरातील कुटुंबालाही वेळ देणे त्यांना शक्‍य होत नाही. ते स्वतः कार्यालयात तर कुटुंब दुसऱ्या मजल्यावरील खोलीत बसलेले आहे.

इस्लामपूर शहर हे श्री. माने यांच्या मतदार संघात येते. या गावातील नऊ आणि त्याच कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या पेठ वडगाव येथील एक अशा मतदार संघातील दहा लोकांचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आलेला आहे. त्यामुळे या दोन्हीही गावांत औषध फवारणी, त्या लोकांच्या संपर्कात आलेल्यांना दवाखान्यात पाठवणे, त्या परिसराकडे जाणारे रस्ते बंद करणे अशी कामे सांगण्यासाठी त्यांचा फोन सतत कानालाच लागलेला आहे.
 
रूग्णवाहिकेला चालक मिळेनात
याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,"घराबाहेर पडता येत नाही पण मतदार संघातील लोकांची काळजी घ्यावीच लागते. पहाटेपासूनच लोक फोन करतात, मी स्वतः हा फोन घेतो, त्यांच्या अडचणी ऐकतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. सद्यस्थितीत सर्वात मोठी अडचण म्हणजे रूग्णवाहिका चालवण्यासाठी चालकच मिळत नाहीत. कोरोनाचे रूग्ण पॉझीटीव्ह आल्याने रूग्णवाहिका रूग्णालयातून नेणे किंवा आणणे ही मोठी समस्या इस्लामपूर आणि परिसरात निर्माण झाली आहे.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com