ठाकरे सरकारला पहिले मतदान मुश्रीफांचे!

'जनसुराज्य' चे संस्थापक आमदार विनय कोरे हे या ठरावाच्या मतदानालाच गैरहजर राहील्याने त्यांचे मतदान झाले आहे.
hasan mushriff vote for thackrey government
hasan mushriff vote for thackrey government

कोल्हापूर : उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरील विश्‍वासदर्शक ठरावासाठी जिल्ह्यातून सर्वात पहिले मतदान राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी नोंदवले तर सर्वात शेवटी कॉंग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांचे मतदान झाले. आज विधानसभेत 169 मतांनी श्री. ठाकरे यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला, यात 17 व्या क्रमांकावर श्री. मुश्रीफ तर 168 व्या क्रमांकावर श्री. आवळे यांनी मतदान केले.

विधानसभेच्या निकालानंतर तब्बल एक महिन्यांनी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्त्वात आले. शुक्रवारी सायंकाळी शिवतिर्थावर झालेल्या शानदार कार्यक्रमात श्री. ठाकरे यांच्यासह या तिन्हीही पक्षाच्या सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर आज विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान झाले. भाजपाने ही प्रक्रिया चुकीची असल्याचा आरोप करून सभात्याग केला. जिल्ह्यातील अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे भाजपासोबत असल्याने ते मतदान प्रक्रियेत सहभागी झाले नाही तर "जनसुराज्य' चे संस्थापक आमदार विनय कोरे हे या ठरावाच्या मतदानालाच गैरहजर राहील्याने त्यांचे मतदान झाले आहे.

विधानभवनात मंत्र्यानंतर ज्येष्ठतेनुसार आमदारांची बैठक व्यवस्था करण्यात येते. त्यानुसार विश्‍वासदर्शक ठरावावर पहिल्यांदा शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान नोंदवले. त्यानंतर अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई या ज्येष्ठ आमदारांची मते मोजण्यात आली. श्री. मुश्रीफ यांनी 17 व्या क्रमांकाला तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार पी. एन. पाटील यांनी 90 व्या, आमदार प्रकाश अबीटकर यांनी 107 व्या, आमदार चंद्रकांत जाधव यांनी 140 व्या, आमदार ऋतुराज पाटील यांनी 141 व्या, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यांनी 147 व्या, आमदार राजेश पाटील यांनी 167 व्या तर श्री. आवळे यांनी 168 व्या क्रमांकावर मतदान केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com