मुश्रीफांच्या विजयासाठी गडहिंग्लजमध्ये पदयात्रा

आमदार हसन मुश्रीफ यांच्या सलग पाचव्या विजयासाठी गडहिंग्लजकर एकवटले आहेत. आज सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दलित महासंघ, आरपीआय गवई गट आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य मार्गांवरून पदयात्रा काढली.
मुश्रीफांच्या विजयासाठी गडहिंग्लजमध्ये पदयात्रा

गडहिंग्लज : आमदार हसन मुश्रीफ यांच्या सलग पाचव्या विजयासाठी गडहिंग्लजकर एकवटले आहेत. आज सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दलित महासंघ, आरपीआय गवई गट आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य मार्गांवरून पदयात्रा काढली. 

या पदयात्रेत प्रमुख कार्यकर्त्यांसह तीन हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले. सकाळी नऊ वाजता नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या हस्ते या पदयात्रेचा प्रारंभ झाला. किसनराव कुराडे, उपनगराध्यक्ष सुनीता पाटील, अबिद मुश्रीफ, उदय जोशी, माजी नगराध्यक्ष लक्ष्मी घुगरी, माजी नगराध्यक्षा कावेरी चौगुले, माजी नगराध्यक्षा मंजूषा कदम, राजशेखर येरटी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी, माजी नगराध्यक्ष राजन पेडणेकर, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, प्रा. जे. बी. बारदेस्कर, राजेश बोरगावे, सागर हिरेमठ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, दिग्विजय कुराडे, नगरसेविका क्रांतिदेवी शिवणे, नगरसेविका नाझ खलीफ, नगरसेवक उदय पाटील, सुरेश कोळकी, रामगोंडा पाटील, प्रकाश कांबळे, शर्मिली पोतदार, नगरसेवक हरुण सय्यद, नगरसेविका रेश्‍मा कांबळे सहभागी झाले होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ झालेल्या सभेत सौ. कोरी म्हणाल्या, ""यापूर्वी कुठेही प्रशासनात काम घेऊन गेलो की, आम्ही सांगायचो, आमचा कोणी आमदार नाही, आमचा कोणी खासदार नाही, परंतु यापुढे अभिमानाने आणि ताठ मानेने सांगत राहू की हसन मुश्रीफ आमच्या हक्काचे आमदार आहेत. गोरगरीब, कष्टकरी कामगार यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्यासाठीच आम्ही मुश्रीफ यांच्यासोबत आहोत.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com