मी जातीधर्माच्या नाही तर विकास कामाच्या मुद्द्यावर मत मागतो :  हसन मुश्रीफ 

भारतीय म्हणून या देशाच्या मातीशी असलेली नाळ कधीही तोडू द्यायची नाही. जातीच्या आणि धर्माच्या नावे मी मते मागत नाही, तर मी विकासकामाच्या मुद्यावर मते मागतो. -हसन मुश्रीफ
hasan-mushrif felicitated at Gadhinglaj
hasan-mushrif felicitated at Gadhinglaj

गडहिंग्लज  : गडहिंग्लज शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे वातावरण हे आदर्श असून भविष्यातही ही परंपरा टिकवून ठेवावी. आपण कोणत्या जातीचे किंवा धर्माचे आहोत यापेक्षा आपण भारतीय आहोत हेच अत्यंत महत्वाचे आहे, असे उद्‌गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.


येथील सुन्नी जुम्मा मस्जिद व मुस्लीम बांधवांतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, "भारतीय म्हणून या देशाच्या मातीशी असलेली नाळ कधीही तोडू द्यायची नाही. समता, बंधूता व धर्मनिरपेक्षतेचा विचार सोडायचा नाही. जातीच्या आणि धर्माच्या नावे मी मते मागत नाही, तर मी विकासकामाच्या मुद्यावर मते मागतो.  गोरबरीबांची कामे करणे, समाजाची सेवा करणे हाच आमचा खरा धर्म आहे. भविष्यात मोठा विकास निधी आणून गडहिंग्लजचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्याचा प्रयत्न करू.''


प्रा. आशपाक मकादार यांनी स्वागत केले. मुस्लिम समाजासाठी शहरात प्रशस्त सभागृहाची गरज असून मुश्रीफ यांनी त्याची पूर्तता करण्याची मागणी मकानदार यांनी केले. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सतीश पाटील यांचा हाजी राबीयाबी खलीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुश्रीफ यांच्या गौरवपत्राचे वाचन प्रा. आझाद पटेल यांनी केले. श्रीमती हनिफाबी मकानदार यांच्या हस्ते मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. 


युनूस नाईकवाडे यांनी आभार मानले. या वेळी घुडूसाहेब मुगळे, घुडुसाहेब मुल्ला, नबीशा मकानदार, घुडूलाल शेख, दस्तगीर मुल्ला, हारूण सय्यद, समीर खडकवाले, पी. एस. नदाफ, खुतबु अत्तार, नदीम शेख, इम्रान चॉंद, फिरोज मणेर, अल्ताफ शानेदिवान, मौलाना पटेल, मंजूर मकानदार, इर्शाद मकानदार, जावेद बुडेखान, एम. एस. बोजगर, मुस्ताक मुल्ला, अमजद मिरा, अस्लम शानेदिवाण, परवेज शेख, रहिम मकानदार, कबीर मुल्ला, ताजुद्दीन सौदागार, जमीर मुल्ला, डॉ. सिकंदर जमादार, नवाब मालदार, शकील काजी, सिकंदर यळकुद्रे, समीर मुल्ला, शाहरूख मुल्ला उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com