त्यांचं दु:ख सांडू द्या, मन मोकळं होवू द्या!  

त्यांचं दु:ख सांडू द्या, मन मोकळं होवू द्या!  

जि. प. सदस्य सतीश पाटील म्हणाले,"गिजवणे-कडगाव मतदारसंघात बहुतांश गावामध्ये राष्ट्रवादीतच दोन गट होते. परंतु, आमदार मुश्रीफ यांच्या विजयासाठी गावागावातील कार्यकर्त्यांनी गटबाजीला मूठमाती देत एकमेकांच्या हातात हात घालून काम केले. म्हणूनच या मतदारसंघातून पाच हजाराहून अधिक मताधिक्‍य मिळविण्यात यश आले. आता भविष्यात आंबेओहोळ प्रकल्पाची पूर्तता व बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा अजेंडा आमदार मुश्रीफ यांनी हाती घ्यावा.''

गडहिंग्लज (कोल्हापूर) : विधानसभेचा निकाल लागल्यापासून रोज कोणीतरी उलट-सुलट वक्तव्ये करीत आहेत. मी तर त्याची नोंदच घेत नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभव त्यांना पचवता आलेला नाही. या पराभवाचे दु:ख त्यांना सांडू द्या, मन मोकळं करू द्या, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांचे नाव न घेता लगावला.

गिजवणे-कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातर्फे आमदार मुश्रीफ व चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी मुश्रीफ बोलत होते. गिजवणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात कार्यक्रम झाला. मुश्रीफ म्हणाले, "तरूणांना रोजगार आणि आंबेओहोळ प्रकल्पाची पूर्ती या गोष्टींची मला विसर पडणार नाही. ही दोन महत्वाची कामे येत्या कालावधीत पूर्ण करणार आहे. नेहमी पोलिसांच्या गराड्यात राहून चंद्रकांत पाटलांना लोकांचे काळीज जिंकता आले नाही. दुसऱ्या क्रमांकाचे मंत्रीपद असतानाही पाटील यांनी कामे न केल्यानेच त्यांना पुण्यातील मतदारसंघ शोधावा लागला. राज्यात आघाडीची सत्ता आलीच तर निश्‍चित जनतेचे कोटकल्याण करू. विरोधात बसावे लागले तरी पूर्वीपेक्षा अधिक गतीने काम करून दुप्पटीने विकास निधी आणू.'' आमदार पाटील म्हणाले, 

"गडहिंग्लज, आजरा व चंदगडमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे माझा विजय झाला. पाच वर्षे गायब असलेली मंडळी ऐन निवडणुकीत येवून पंधरा दिवसात पैसे उधळून मते खरेदीचा प्रयत्न केला. परंतु, या प्रवृत्तीला नाकारून निष्ठावंत जागृत मतदारांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम केले. येत्या कालावधीत आदर्शवत काम करून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलू.''

जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, शिवाजी खोत, के. बी. पोवार, ए. आर. पाटील, सोमगोंडा आरबोळे यांची भाषणे झाली. आदित्य पाटील यांनी स्वागत केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com