थोरातच सोडवतील जिल्हा विभाजनाचा प्रश्‍न

श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी महसूलमंत्री थोरात यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई येथे भेटणार असल्याचे कृतिसमितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी सांगितले.
hasan mushriff on nagar district bifurcation
hasan mushriff on nagar district bifurcation

श्रीरामपूर: नगर जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा, या मागणीचे निवेदन श्रीरामपूर जिल्हा कृति समितीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. त्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याच जिल्ह्यातील असून, तेच जिल्हा विभाजनाचा प्रश्‍न मार्गी लावू शकतात, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री मुश्रीफ नगर येथे आले असताना, कृति समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवेदन दिले. नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार लहू कानडे यांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा मांडल्याने प्रशासकीय हालचालींना वेग आला.

आमदार रोहित पवार यांच्यासह नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनाही जिल्हा विभाजनाबाबत निवेदने दिली आहेत. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी महसूलमंत्री थोरात यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई येथे भेटणार असल्याचे कृतिसमितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com