आणि जिममध्ये आमदार मुश्रीफांनी चक्क वर्काऊट केले ! - Hasan Mushriff in GYM | Politics Marathi News - Sarkarnama

आणि जिममध्ये आमदार मुश्रीफांनी चक्क वर्काऊट केले !

सरकारनामा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

व्यायामशाळेतील शरीर सौष्ठवसाठी आवश्यक असलेल्या ट्रायसेफ,बायसेफ, थाईज आणि चेस्ट या विविध व्यायाम प्रकारांची साधनेही हसन मुश्रीफ यांनी सहजरीत्या हाताळली.

मुरगूड :निवडणुका जवळ आल्यावर राजकीय नेत्यांना काय करावे लागत नाही ? याकाळात राजकीय नेत्यांना विविध प्रकारच्या कसरती मतदारांना आकर्षित  करण्यासाठी कराव्या लागतात.  आमदार हसन मुश्रीफ यांनी जिममध्ये तरुणांना विविध प्रकारचे वर्कआउट्स करून दाखवले !

मळगे खुर्द (ता.कागल) येथे आमदार हसन मुश्रीफ यांनी आमदार फंडातून उभारलेल्या जिमचे मंगळवारी  उद्घाटन केले.   जवळच असलेल्या काँबी मशीनवर बॅक मसल्स मारत उपस्थित तरुणाईला व ग्रामस्थांना व्यायाम आणि आरोग्याचे महत्त्व सांंगीतले.

आमदार मुश्रीफ मळगे खुर्द येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आले असता त्यांनी एखाद्या कसलेल्या व्यायामपटू प्रमाणे केलेल्या या व्यायामाच्या प्रात्यक्षिकांनी अख्खी तरुणाई,ग्रामस्थ भारावून गेली. व्यायामशाळेतील शरीर सौष्ठवसाठी आवश्यक असलेल्या ट्रायसेफ,बायसेफ, थाईज आणि चेस्ट या विविध व्यायाम प्रकारांची साधनेही त्यांनी सहजरीत्या हाताळली.

व्यायाम शाळेतील आमदार मुश्रीफांच्या या वर्काऊटचे तरुणांसह अनेक ग्रामस्थांनी फोटो काढले, व्हिडिओ शूटिंग केले आणि सेल्फीही घेतल्या.शिवाय त्यांच्या व्यायामाच्या शैलीचेही गावकऱ्यांनी कौतुक केले.

यावेळी उद्योगपती संजय चौगुले, यांच्यासह आनंदा पाटील,पांडुरंग पाटील , बचाराम पाटील, ईश्वरा पाटील, विठ्ठल पाटील , ए.एम.पाटील, विलास पाटील, मधुकर संकपाळ , अशोक चौगुले, सदाशिव कांबळे, विजय पाटील, रंगराव पाटील, रवींद्र पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख