मुश्रीफांना 7 पैकी 6 जि. प.सर्कलमध्ये आघाडी 

Hasan Mushriff
Hasan Mushriff

सिद्धनेर्ली  : कागल विधानसभा मतदारसंघात आमदार हसन मुश्रीफ यांना सातपैकी सहा जिल्हा परिषद मतदारसंघात, तर तीन पैकी दोन नगरपालिकेत प्रथम क्रमांकाची मते मिळाली.

अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना एका जिल्हा परिषदसह एका नगरपालिकेवर प्रथम क्रमांकाची मते मिळाली. 


शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांना सिद्धनेर्ली जि. प. मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते वगळता उर्वरित सर्व ठिकाणी ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


मुश्रीफ यांना सिद्धनेर्ली, बोरवडे, चिखली, कापशी, उत्तूर, कडगाव या जि. प. मतदारसंघासह कागल व गडहिंग्लज नगरपालिकेतही प्रथम क्रमांकाची मते मिळाली. तर समरजितसिंह घाटगे यांना कसबा सांगाव जि. प. व मुरगूड नगरपालिकेत प्रथम क्रमांकाची मते मिळाली.


वाढीव गडहिंग्लज शहर व उत्तूर, कडगाव जि. प. मतदारसंघातही मुश्रीफ यांना प्रथम, समरजितसिंह यांना दुसऱ्या, तर संजय घाटगे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.


कसबा सांगाव जि. प. मतदारसंघांत मुश्रीफ यांची ताकत असूनही समरजितसिंह घाटगे यांनी प्रथम क्रमांकाची लक्षवेधी मते मिळवली.

याशिवाय शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे वर्चस्व असलेल्या व नगरपालिका ताब्यात असलेल्या मुरगूड शहरातही त्यांनी प्रथम क्रमांकाची मते घेतली. संजय घाटगे यांचा बालेकिल्ला सिद्धनेर्ली जि. प. मतदारसंघात त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com