hasan mushriff on chandrakant patil | Sarkarnama

चंद्रकांतदादांना सावरण्याची शक्ती परमेश्‍वराने द्यावी!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

दोन दिवसांपुर्वी श्री. पाटील यांनी श्री. मुश्रीफ यांच्यावर टीका करताना साखर कारखाना काढायला श्री. मुश्रीफ यांच्याकडे एवढे पैसे आले कोठून, त्यांनी संपत्ती कशी मिळवली याची चौकशी करायला पाहीजे अशी टीका केली होती.

कोल्हापूर : राज्यातील भाजपाची सत्ता गेल्याचा झटका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलाच बसलाय आहे, त्यातून सावरण्याची शक्ती त्यांना परमेश्‍वराने द्यावी, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज लगावला.

दोन दिवसांपुर्वी श्री. पाटील यांनी श्री. मुश्रीफ यांच्यावर टीका करताना साखर कारखाना काढायला श्री. मुश्रीफ यांच्याकडे एवढे पैसे आले कोठून, त्यांनी संपत्ती कशी मिळवली याची चौकशी करायला पाहीजे अशी टीका केली होती.

आज जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने श्री. मुश्रीफ कोल्हापुरात होते. श्री. पाटील यांनी केलेल्या आरोपाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले,"मी लहानपणी तीन चाकी सायकलवरून फिरलो, मोठा झाल्यानंतर दोन चाकी सायकल आणि नंतर गाडीतून फिरू लागलो. माझ्यावर यापुर्वीही त्यांनी साखर कारखाना आणि संपत्तीबाबत टिका केली होती, त्यामुळे वारंवार त्यांनी केलेल्या टिकेला उत्तर देण्यात स्वारस्य वाटत नाही. लहानपणापासूनच आमची परिस्थिती चांगली आहे. सत्ता गेल्यामुळे चंद्रकांतदादांना झटका बसला आहे. त्यातून सावरण्याची शक्‍ती परमेश्‍वराने द्यावी.'
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख