पूरग्रस्तांच्या रोषाला घाबरून चंद्रकांतदादाचे पुण्यात ध्वजारोहण  : हसन मुश्रीफ

.
HASAN_MUSHRIF_CHANDRAKANT
HASAN_MUSHRIF_CHANDRAKANT

कोल्हापुर : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात उद्भवलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात थांबून राहणे आवश्‍यक होते. परंतु, ते सोडून गेले चार दिवस ते कोल्हापूर बाहेर आहेत. दरम्यान; पूरग्रस्तांच्या रोषाला घाबरूनच श्री . पाटील यांनी कोल्हापूर ऐवजी पुण्यात ध्वजारोहण केले, असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पूरग्रस्तांचे हे दुर्दैवच आहे असा टोलाही, श्री मुश्रीफ यांनी लगावला आहे. 

याबाबत आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रक प्रसिद्धीला दिली आहे. या पत्रकात म्हटले आहे, अशा गंभीर परिस्थितीत वास्तविक पालकमंत्री पाटील यांनी शासन यंत्रणा नेटाने कामाला लावून पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे काटेकोरपणे आणि तातडीने व्हायला पाहिजेत, यावर लक्ष ठेवायला हवे होते. 
सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते पुण्यात आणि श्री पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात झेंडावंदन झाले असते तर ते अधिक उचित झाले असते. 

चंद्रकांतदादांनी पूरग्रस्तांच्या साथीने झेंडावंदन केले , असा संदेश समाजात गेला असता. उलट, देशाचे ऐंशी वर्षाचे नेते शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर येऊन पूरग्रस्तांची संवाद साधत त्यांच्यात मिसळून त्यांच्या अडचणी समजून घेतात . त्यांना दिलासा देतात. तसेच कोल्हापूरातच पूरग्रस्तांच्या सोबत झेंडावंदनही करतात . ही बाब निश्‍चितच भूषणावह अशीच आहे. श्री पवार यांचा आदर्श श्री पाटील यांनी घेण्याची आवश्‍यकता होती. 

या महाप्रलयंकारी पुरामुळे जिल्ह्यात अक्षरश सुन्न झालेले वातावरण आहे. महापुराचे पाणी ओसरत असले तरी गेले अनेक दिवस पुराच्या पाण्याखाली राहिलेले ऊस काळे ठिक्कर पडले आहेत. कुजलेली भात , सोयाबीन आणि भुईमुगाची पिके पाहून शेतकऱ्याचं अंतकरण चिरत आहे. घरे पडून ते बेघर झालेले आहेत. शहरांमध्ये तर फारच भयानक अवस्था आहे. 

गल्ल्याच्या -गल्ल्या, पेठा आणि रस्ते महापुरात बुडाल्यामुळे त्यांचे अंथरुण -पांघरुण , सोफासेट , बेडशीट, चादर ,कपडे आदी तसेच धनधान्य सर्वच महापुराच्या पाण्यात भिजून कुजून गेले आहे. तसेच टीव्ही , फ्रीज , कॉम्प्युटर , विद्यार्थ्यांचे लॅपटॉप , दप्तर अक्षरशा भंगार होऊन पडले आहे. छोटे-मोठे दुकानदार व्यापारी यांचे जीवनात कधीही भरून येणार नाही एवढे नुकसान झाले आहे .

 अक्षरशा पंधरा-वीस वर्षांनी ते मागे गेलेले आहेत. या सर्व नुकसानग्रस्तांना विम्याची भरपाई देण्यामध्ये विमा कंपन्या हात वर करीत आहेत. त्या विमा कंपन्यांना नुकसान भरपाई देणे सरकारने भाग पाडणे गरजेचे आहे. या आपत्तीमुळे हजारो कोटीचे नुकसान झालेले असताना आपले पालकमंत्री चार-चार दिवस परगावी राहतात, ही निश्‍चितच जिल्ह्याच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com