Pawar - Mushriff
Pawar - Mushriff

पवारांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपाचे पित्त खवळले : हसन मुश्रीफ

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून श्री. पवार यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्यातून भाजपाचे पित्त खवळले .-आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर :  विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्रभर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे भाजपा नेत्यांचे पित्त खवळले असून त्यातून ज्या संस्थेशी श्री. पवार यांचा संबंध नाही त्यातील गैरव्यवहाराबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

श्री. मुश्रीफ म्हणाले,"एका जनहित याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले. मुळात एखाद्या संस्थेची सहकार कायदा कलम 88 अन्वये चौकशी झाल्याशिवाय अपहार झाला का नाही हेच सिध्द होत नाही. ज्या पोलीस ठाण्यात आमच्यावर गुन्हा दाखल आहे, त्यांनी कधी आम्हाला चौकशीला बोलवले नाही, कसलीही नोटीस नाही आणि आज आम्ही थेट टीव्हीवरच आमच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या बघत आहोत.''

''श्री. पवार हे तर गेल्या 60 वर्षात कोणत्याही संस्थेत संचालक किंवा अध्यक्ष नाहीत पण या प्रकरणात त्यांच्यावरही गुन्हा दाखल होतो, म्हणजे याचा अर्थ गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून श्री. पवार यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्यातून भाजपाचे पित्त खवळले असल्याचे कारवाईवरून दिसते'', असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.

याबाबत माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले,"मी बॅंकेत निवडूनच गेलो नव्हतो, सरकारने मला नियुक्त केले होते, मी सरकारकडेही माझी नियुक्ती करा म्हणून गेलो नव्हतो. त्यामुळे माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याविषयी मी जास्त बोलणार नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com