हसन मुश्रीफ हे शरद पवारांसोबतच !

मुंबईतील घडामोडीनंतर पहिल्यांदा श्री. पवार यांच्या "सिल्वर ओक' या निवासस्थानी जाऊन श्री. मुश्रीफ यांनी त्यांची भेट घेतली,
hasan-mushrif is with Sharad Pawar
hasan-mushrif is with Sharad Pawar

कोल्हापूर :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपात येण्याचे आमंत्रण दिले, त्याला नकार दिल्यानंतर थेट प्राप्तीकर विभागाची धाडही घरावर पडली होती . 

तरीही 'शरद पवार एके शरद पवार' हेच आपले अंतिम ब्रीदवाक्‍य असल्याचे सांगणारे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांनी आजही आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे कृतीतून सिध्द करून दाखवले. 

श्री. मुश्रीफ हे काहीही झाले तरी पवार यांची साथ सोडणार नाही असा विश्‍वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. श्री. मुश्रीफ यांनीही आपण श्री. पवार यांच्यासोबतच राहू असे सांगितले आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात श्री. पवार यांच्याशी एकनिष्ठ अशी श्री. मुश्रीफ यांची ओळख आहे. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीत असतानाच श्री. मुश्रीफ यांच्याशी त्यांचा वाद झाला. या वादाने टोक गाठले पण त्या सर्व वादात श्री. पवार यांनी मात्र श्री. मुश्रीफ यांनाच बळ दिले. लोकसभा निवडणुकीच्या कागल येथे झालेल्या प्रचारसभेत मी जो आज काही आहे तो केवळ श्री. पवार यांच्यामुळेच असे सांगतानाच श्री. मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले होते. 

पण आज अचानक राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आणि राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनीच भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या भुकुंपानंतर जिल्ह्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली.

या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते श्री. मुश्रीफ काय करणार याविषयी उत्सुकता होती. तथापि मुंबईतील घडामोडीनंतर पहिल्यांदा श्री. पवार यांच्या "सिल्वर ओक' या निवासस्थानी जाऊन श्री. मुश्रीफ यांनी त्यांची भेट घेतली, त्यानंतर दिवसभर श्री. मुश्रीफ हे श्री. पवार यांच्यासोबत होते, त्यामुळे ते राष्ट्रवादीसोबतच राहतील हे स्पष्ट झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com