बाळासाहेबांचे स्वप्न साकारणार ,शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार :हसन मुश्रीफ 

..
hasan-mushrif-mla-
hasan-mushrif-mla-

कोल्हापूर :  राज्यात भाजपची सत्ता यावी ही परमेश्‍वराचीही इछा नसावी,त्यामुळेच आता लवकरच शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीची सत्ता स्थापन होईल. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास राष्ट्रवदी कॉग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत व्यक्त केला. 

थेट पाईलाईन योजनेसह शहरातील सर्वच महत्वाच्या कामात भाजप सरकारच्या काळात अन्याय झाला असून त्यांनी अनेक कामात खोडा घातल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी यावेळी केला.

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, सध्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी चांगल्या विचाराने शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील. गेल्या पाच वर्षात भाजप सरकार सत्तेत असतांना निधीच्या बाबतीत दुजाभाव केला गेला.

भाजप सरकारच्या काळात कोल्हापूर महापालिकेला पुरेसा निधी मिळाला नाही अन्याय झाला आहे. त्यामुळे शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही. कोल्हापूरला स्मार्ट सिटी करण्याचे स्वप्न या सरकारने भंग केले आहे. आघाडी सरकारच्या काळात आम्ही मार्गी लावलेली अनेक कामे अपूर्ण आहेत. जशीच्या तशी आहेत.

शिवसेनेच्या भूमिकेमुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेची आघाडी होऊन सत्ता स्थापन होईल आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com