मुश्रीफ म्हणाले, उध्दव ठाकरेंविषयी माझ्या मनात काही गैरसमज होते पण .. 

मात्र भेटीनंतर समजले की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अतिशय सरळ, अतिशिय सज्जनआणि शांत गृहस्थ आहेत.
Hasan Mushriff.
Hasan Mushriff.

कोल्हापूर  : शिवसेनेचा प्रमुख आणि शिवसेना पक्ष यांच्याबद्दल माझ्या मनात गैरसमज होते. पण, ते गैरसमज आता दुर झाले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अतिशय सरळ, सज्जन  आणि शांत गृहस्थ आहेत, असा निर्वाळा आमदार हसन मुश्रीफ यांनी आज दिला.

येथील तपोवन मैदानावर सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाची आज सांगता झाली. यावेळी आमदार मुश्रीफ बोलत होते. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, शिवसेनेचा प्रमुख आणि शिवसेना पक्ष यांच्याबद्दल माझ्या मनात काही गैरसमज होते. त्यांची आणि आपली फारशी भेट होत नाही. काल महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमा प्रश्‍नाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आपली भेट झाली. मात्र या भेटीनंतर समजले की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अतिशय सरळ, अतिशिय सज्जन  आणि शांत गृहस्थ आहेत. त्यामुळे त्यांबद्दल माझ्या मनात असणारा गैर समज दूर झाला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्जमुक्ती आणि कर्जमाफीची जी घोषणा केली आहे. तीच  त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असणार आहे. त्यामुळे आम्ही त्या घोषणेची चातकासारखी वाट पाहत आहोत. जिल्हा बॅंकांच्या पदाधिकाऱ्यांशीही सल्लामसलत करावी. गेल्या सरकारने या कर्जमाफी बद्दल जी थट्टा केली आहे. ती पुन्हा तशी होवू नये. 


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34 हजार कोटींची कर्जमाफी करण्यासाठी विधीमंडळाने परवानगी दिली. त्यातील केवळ 12 हजार कोटीच खर्च झाले. पश्‍चिम महाराष्ट्रात या कर्जमाफीचा लाभ झाला नाही. सरकारने अनेक अटी घातल्या. ऑनलाईन अर्ज मागविले. अनेकांना या कर्जमाफीपासून दूर ठेवण्याचे काम केले. यावेळीला सरसकट कर्जमाफीची घोषणा व्हावी, ती चांगल्या पध्दतीने व्हावी आणि निर्दाष आणि गरज शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणीही आमदार मुश्रीफ यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com