मला घागर मारणारा अद्याप जन्मायचा आहे - हसन मुश्रीफ

  मला घागर मारणारा अद्याप जन्मायचा आहे - हसन मुश्रीफ

कोल्हापूर : मला घागर फेकून मारणारा अद्याप जन्माला यायचा आहे, अशा कडक शब्दात आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुश्रीफ यांना घागर मारल्याच्या उठलेल्या अफवा, आलेल्या बातम्या आणि सोशल मीडियावरून प्रसारित झालेली चित्रे हा पूर्वनियोजित कटकारस्थानाचा एक भाग आहे, असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. 

नानीबाई चिखली (ता कागल) इथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा मोहन कांबळे होत्या. यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, बेलेवाडी काळम्मा (ता कागल ) येथे उभारलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना हा शून्य प्रदूषणाचा अत्यंत अद्ययावत प्रकल्प आहे. तरीसुद्धा बेलेवाडी काळम्मा ग्रामस्थांनी दूषित पाणी आल्याच्या कारणावरून रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते. त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न मिटवूया, या भावनेने मी शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास तिथे गेलो. ग्रामस्थांशी चर्चा करून त्या वादावर पडदा टाकून मी निघून गेल्यानंतर कारखान्याचे कामगार आणि ग्रामस्थ बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान वादात झाले. त्या वेळी ग्रामस्थांनी पाण्याने भरलेल्या घागरी कामगारांच्या दिशेने फेकलेल्या. परंतु यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांना धक्काबुक्की होऊन त्यांच्या अंगावर पाण्याच्या घागरी फेकल्या, अशा वावड्या उठवल्या. या प्रकाराच्या पाठीशी असलेल्या छुप्या शक्तीला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 


श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले," गेली तीस-पस्तीस वर्षे सामाजिक कार्य करीत असताना संघर्षाचे अनेक प्रसंग आले आणि गेले, परंतु वैयक्तिक सुडाचे राजकारण कधीही केले नाही. दरम्यान असा एखादा मोठा प्रक्रिया प्रकल्प उभा केला असता त्याचा त्रास काही अंशी नागरिकांना होत असतो. शाहू साखर कारखाना सुरू होऊन 42 वर्षे झाली. कागल शहरासह पुढे सांगाव, सुळकुंडचे नागरिक वर्षानुवर्षे हा त्रास सहन करीतच असल्याचे सांगत भाजपच्या समरजीतसिंह घाटगे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com