शाहू महाराजांनी " एनआरसी ' कायदा फाडला असता - हसन मुश्रीफ

 शाहू महाराजांनी " एनआरसी ' कायदा फाडला असता - हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी विविध जातीची वसतिगृहे सुरू केली, त्यातून विद्यार्थी घडत गेले, पण आज देशाची परिस्थिती बघितली तर एनआरसी, सीएएसारखे कायदे होत आहेत, राजर्षी शाहू महाराज जिवंत असते तर हे कायदे फाडून टाकले असते असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 

राजर्षी शाहू महाराज यांच्या समधीच्या लोकार्पण सोहळ्यात श्री. मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले,"या समाधीचा लोकार्पण सोहळा श्री. पवार यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा होते आणि आज यानिमित्ताने ती पूर्ण झाल्याचा आनंद आमच्यासारख्यांना आहे. महापालिकेच्या स्वनिधीतून आणि इतिहासकारांनी संशोधन केल्याप्रमाणे ज्याठिकाणी आपली समाधी व्हावी अशी शाहू महाराजांची इच्छा होती, त्याचठिकाणी ती झाली. श्रीमंत शाहू महाराज यांनी त्यासाठी उदार मनाने नर्सरी बागेची जागा दिली. लोकांनीही समतेच्या विचाराचा जागर करत हा कार्यक्रम झाला. 

ज्या काळात जातीयवादाची बीजे छोट्या छोट्या प्रमाणात रूजली जात होती, त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या दलित समाजातील मुलाला शिक्षणासाठी मदत केली. पुढे डॉ. आंबेडकर यांना परदेशी शिक्षणासाठी सहकार्य केले. बॅरिस्टर होऊन आल्यानंतर डॉ. आंबेडकरांचे स्वागत तर केलेच पण माणगांव येथे परिषद घेऊन डॉ. आंबेडकर हेच पुढच्या काळातील तुमचे नेते असतील त्यांच्या नेतृत्त्वाखाली तुम्ही काम करा असे शाहू महाराजांनी दलितांना सांगितले होते. 

शाहू महाराजांच्या समतेच्या विचारामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता पाचवेळा विधानसभेत विजयी झाला, मंत्री झाला. हा शाहू महाराजांच्या समतेच्या विचाराचा विजय असल्याचे मी मानतो. या समतेच्या विचाराचा जागर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभर केला आहे. म्हणून श्री. पवार यांनी यावे अशी इच्छा आमची होती, असे श्री. मुश्रीफ म्हणाले. 

श्री. मुश्रीफ म्हणाले,"शाहू महाराजांनी विविध जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढली, अस्पशृता निवारणासाठी एका दलिताला हॉटेल काढून देऊन स्वतः त्याठिकाणी चहा पिले. देशात आज एक वेगळी परिस्थिती आहे, एनआरसी, सीएएसारखे कायदे होऊ घातले आहेत. राजर्षी शाहू महाराज जिवंत असते तर हे कायदे फाडून टाकले असते.' 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com