एकाच पदासाठी हटून बसलेले हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील एकाच रेल्वेने आले..

hasan mushrif-satej patil
hasan mushrif-satej patil

कोल्हापूर ः जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात आलेल्या गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानकावर जल्लोषात स्वागत केले. श्री. पाटील यांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन कार्यकर्त्यानी परिसर दणाणून सोडला.

मंत्री पाटील यांची यापूर्वी भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली होती तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापुरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. श्री. थोरात यांनी या पदावर काम करण्यास नकार दर्शवल्यानंतर कोल्हापुरच्या पालकमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार? याविषयी उत्सुकता होती. अखेर शासनाने काल (ता. 15) गृहराज्यमंत्री पाटील यांच्याकडेच कोल्हापुरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली.

निवडीनंतर काल सकाळी मंत्री पाटील यांचे महालक्ष्मी एक्‍स्प्रेसने कोल्हापुरात आगमन झाले. याच रेल्वेतून या पदासाठी इच्छुक असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेही आगमन झाले. रेल्वेतून श्री. पाटील उतरताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा कोल्हापुरी फेटा व पुष्पहार देऊन सत्कार झाला.

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर सागर चव्हाण, नगरसेवक राहूल माने, श्रीराम सोसायटीचे सभापती धनाजी गोडसे, सचिन चव्हाण, दुर्वास कदम आदी उपस्थित होते. प्रशासनातर्फे करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी स्वागत केले.

बावड्यातही स्वागत
मंत्री. पाटील यांचे त्यांच्या कसबा बावडा येथील यशवंत निवास या निवासस्थानीही जंगी स्वागत झाले. तत्पुर्वी बावड्याच्या मुख्य मार्गावर फटाक्‍यांची आतषबाजी करून लोकांना साखर-पेढे वाटप केले. या परिसरातील महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बावड्यातील सर्व नगरसेवक, श्रीराम सोसायटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com