आईच्या तडफेने माता-भगिनी धावून आल्या, जनतेचे हे ऋण कसे फेडू..? - हसन मुश्रीफ

आईच्या तडफेने माता-भगिनी धावून आल्या, जनतेचे हे ऋण कसे फेडू..? - हसन मुश्रीफ

कागल : आमच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला. या क्षणी जर माझी आई जिवंत असती आणि ती ज्या तडफेने मुलासाठी धावून आली असती, त्याच तडफेने कागल शहरासह परिसरातील हजारो माता-भगिनी माझ्यासाठी धावून आल्या. जनतेचे हे ऋण कसे फेडू ? अशी भावनिक प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. 

मुंबईवरून महालक्ष्मी एक्‍सप्रेसने सकाळी सात वाजता कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर उतरलो. मोटारगाडीने साडेसात वाजता दारात येताच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरावर छापा टाकत असल्याची सूचना दिली. मीही त्यांना, सरकारी कारवाईस कुठलीही अडचण करणार नसून, उलट जे हवं ते सहकार्य राहील असे स्पष्ट केले. पंधरा तासाच्या या धाडसत्रात अधिकाऱ्यांनी कोणताही त्रास दिला नाही. परंतु माझी पत्नी , सुना, मुले आणि नातवंडे यांच्यासाठी दिवसभर बंदिस्त राहणं हे सुद्धा तणावाचे होते, असे ते म्हणाले. 

श्री. मुश्रीफ म्हणाले, एरवी एखादे घर असो, कंपनी असो अथवा ऑफिस, तिथे छापा पडला की लोक त्या ठिकाणापासून लांब लांब पळून जात असतात. माझ्या घरावरील छाप्याच्यावेळी मात्र मला जे लोकांचे प्रेम आढळून आले ते विलक्षण होते. मोठ्या संख्येने लोक दिवसभर घर आणि परिसरातच थांबून होते. ते म्हणाले, सकाळी सहापासून आपल्या अडीअडचणी गा-हानी घेऊन येणारी जनता आणि त्यांचे प्रश्न सोडविणे, असे नेहमीचे चित्र असायचे. 

दारात हजारोंच्या संख्येने आलेल्या जनतेला अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार इथून निघून जा, म्हणून हाकलून लावताना अक्षरशः माझे काळीज पिळवटून निघत होते. घराच्या प्रवेशद्वाराच्या आत मी आणि प्रवेशद्वाराच्या बाहेर हजारोंच्या संख्येने जमलेली जनता असे असताना, ते मला भेटू शकत नव्हते आणि मी त्यांना भेटू शकत नव्हतो, त्यामुळे हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि दुःखद दिवस मानावा लागेल , असे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com