प्रतापकाका ढाकणेंना जयंत पाटलांचा 'ग्रीन सिग्नल'?

लोकसभेच्या नगर दक्षिण मतदार संघाच्या जागेसाठी मागील अनेक दिवसांपासून खल सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. या निवडणुकीतही राष्ट्रवादीच ही जागा लढवेल, असे वक्तव्य अनेकदा सर्वच वरिष्ठ नेत्यांनी केले आहे. तरीही काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे ही जागा काँग्रेसला म्हणजेच मुलगा डाॅ. सुजय विखे यांच्यासाठी मिळवितील, अशी शंका सर्वच नेत्यांमध्ये आहे. अजूनही त्याची स्पष्टता झाली नाही, त्यामुळे संभ्रम कायम आहे. या पार्श्वभूमीवर काल जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आले आहे.
Jayant Patil- Pratap Dhakne
Jayant Patil- Pratap Dhakne

नगर : लोकसभेची नगर दक्षिणेची जागा आपणच लढविणार आणि ती जिंकूनही येणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला. या निवडणुकीसाठी दक्षिणेतील कार्यकर्त्याना सज्ज होण्याच्या सूचना दिल्या. त्या वेळी पक्षाचे राज्य सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांच्या पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विशेष टाळ्यांचा कडकडाट केला. हा सज्ज राहण्याचा इशारा जणू अॅड. ढाकणे यांनाच मिळाला. त्यामुळेच प्रतापकाका सज्ज व्हा, असं सांगितल्याचं समजून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

लोकसभेच्या नगर दक्षिण मतदार संघाच्या जागेसाठी मागील अनेक दिवसांपासून खल सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. या निवडणुकीतही राष्ट्रवादीच ही जागा लढवेल, असे वक्तव्य अनेकदा सर्वच वरिष्ठ नेत्यांनी केले आहे. तरीही काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे  ही जागा काँग्रेसला म्हणजेच मुलगा डाॅ. सुजय विखे यांच्यासाठी मिळवितील, अशी शंका सर्वच नेत्यांमध्ये आहे. अजूनही त्याची स्पष्टता झाली नाही, त्यामुळे संभ्रम कायम आहे. या पार्श्वभूमीवर काल जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आले आहे.

जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी आपण ही जागा सर्व ताकद लावून लढवू व जिंकू, अशी भीष्म प्रतिज्ञा केली. आपला उमेदवार विजयी करण्याची आस असली, तरी उत्तरेतील अतिक्रमण (विखे पाटील यांचे) आपल्याकडे नको, अशीच खुमखुमी त्यांच्या मनात असल्याचे काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले. त्यामध्ये जयंत पाटील यांनी भाषणातून मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील कोणतीही शक्ती आडवी आली, तरी घाबरू नका, असा टोला विखे पाटील यांना लगावल्याने ही जागा निश्चित राष्ट्रवादीच लढवेल, असे कार्यकर्त्यांना वाटायला लागले आहे.

..... मग दावेदार कोण
जर राष्ट्रवादीच ही जागा लढविणार असेल, तर उमेदवारीसाठी कोण चर्चेत आहे, याबाबतही खल सुरू होता. एक नंबरला नाव येते ते पक्षाचे राज्य सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांचे. पाथर्डी तालुक्यातील अॅड. ढाकणे यांना पाथर्डीतील राष्ट्रवादीबरोबरच भाजपचे नेतेही साथ देतील, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यांनी तशी बांधणीही केलेली दिसून येते. परंतू, त्यांना नगर शहरातील संपर्क वाढविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण याच उमेदवारीसाठी विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप हेही इच्छुक आहेत. शहरातील आमदार द्वयी (आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप) अॅड. ढाकणे यांना किती मदत करतील, यावर गणिते अवलंबून असतील. आमदार जगताप हेही इच्छुक आहेत. परंतू, निलंबित केलेल्या नगरसेवकांची घरवापसी करण्यात जगताप अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे नगरसेवकांना पुन्हा पक्षात न घेवून राष्ट्रवादीने जगताप यांचे पंख छाटल्याची भावना तयार झाली आहे. आगामी काळात याबाबत निर्णय होईलही, परंतु तोपर्य़ंत लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली असेल. एकूणच अॅड. ढाकणे यांना काल जयंत पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिले, असेच वातावरण कालच्या मेळाव्यात तयार झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com