harshwardhan to wel come cm in indapur | Sarkarnama

हर्षवर्धन आता भाजपचे नेते म्हणून मुख्यमंत्र्यांचे इंदापुरात स्वागत करणार

राजकुमार थोरात
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

वालचंदनगर : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा शनिवार (ता. १४) रोजी इंदापूर तालुक्यात येणार आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यातील नव्या व जुन्या कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे.

भाजपच्या तिसऱ्या टप्यातील महाजनादेश यात्रेस आज शुक्रवार (ता. १३) रोजी पासुन सुरवात झाली. यात्रेचा उद्याचा दुसरा दिवस असून यात्रा दौंड तालुक्यातील सभेनंतर यात्रा इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये येणार आहे.

कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते व  माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सध्या तालुक्यामध्ये भाजपच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भिगवणमध्ये भाजपच्या वतीने यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार असून हर्षवर्धन पाटील  यांच्यासह जनसमुदाय यात्रेचे स्वागत करणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री मुंबईला जाण्याची शक्यता असल्याने नियोजित वेळेपेक्षा उशीरा यात्रा इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये येण्याची शक्यता आहे. यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या भाषणाकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी गेली चार वर्षे भाजप सरकारवर टीका केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. आता तेच फडणवीस यांचे स्वागत करणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख