हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनेच पाठिराख्यांत उत्साह

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनेच पाठिराख्यांत उत्साह

वालचंदनगर : कॉग्रेसचे नेते,माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे इंदापूर तालुक्यातील सध्याच्या काॅग्रेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला आज सकाळपासूनच वेग आला. पाटील तालुक्यात नसतानाही  कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस आज जोशामध्ये साजरा केला. पाटील यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरदार सुरु झाली. तसे घडत असल्याने पाटील यांच्या पाठिराख्यांत उत्साह संचारला.

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या दीड वर्षापासून इंदापूरच्या विधानसभेच्या जागेचा घोळ सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यमान आमदारांच्या जागा ज्या-त्या पक्षाकडे राहतील असे सूत्र  सांगून एखादी जागा अपवाद असल्याचे सांगितले होते. मात्र इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी कॉग्रेस सोडणार नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर पाटील यांनी तातडीने तालुक्यामध्ये गेल्या महिन्यापासून गावभेट दौऱ्यांचे आयोजन करुन जनता सांगेल त्या पक्षातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. 

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तालुक्यातून ७० हजारापेक्षा जास्त मताधिक्य दिले असून विधानसभेला राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळावे  असे सांगितले. मात्र यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

गावोगावीचे कार्यकर्ते पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करा... आमचा हर्षवर्धन पाटील हाच पक्ष असून  तुम्ही ज्या पक्षात झेंडा हातात घेणार त्या पक्षाचा आम्ही प्रचार करणार अशी गळही घालत होते. पाटील यांनी १२ ऑगस्ट रोजी मेळावा घेण्याचे जाirर केले होते. मात्र पाटील यांना इंदापूरची जागा आघाडीच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादीला जाणार असल्याचा अंदाज आल्याने  अचनाक मेळावा पुढे ढकला होता. हर्षवर्धन पाटील यांचा भाजपप्रवेश निश्‍चित असल्याची चर्चा सुरु असून मुर्हूत कधीचा हीच चर्चा तालुक्यात सुरु आहे.

सर्वसामान्यांची कामे मार्गी लागणार

सध्या इंदापूर तालुक्तील प्रशासनावर वचक नाही. किरकोळ कामासाठी सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. हर्षवर्धन पाटील भाजप पक्षातून आमदार झाल्यास सर्वसामान्य नागरिकांची कामे तातडीने मार्गी लागण्यास मदत होईल. पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा जनतेला फायदा होणार असल्याचे जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले यांनी सांगितले.

यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या भारती मोहन दुधाळ यांनी सांगितले की,इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून शेतीच्या पाण्याचा  प्रश्‍न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांची हजारो एकर पिके जळाली. पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्यातून हक्काचे पाणी मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com