महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन आता नाशिक महापालिकेचा 'ब्रॅण्ड ऍम्बेसिडर' - Harshwardhan Sadgir Will Be Brand Ambassador of Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन आता नाशिक महापालिकेचा 'ब्रॅण्ड ऍम्बेसिडर'

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 जानेवारी 2020

हाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकून पहिल्यांदाच त्यावर नाशिकचे नाव हर्षवर्धन सदगीर याने झळकावले आहे. त्यासाठी त्याचा महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे

नाशिक  :  महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकून पहिल्यांदाच त्यावर नाशिकचे नाव हर्षवर्धन सदगीर याने झळकावले आहे. त्यासाठी त्याचा महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्याला महापालिकेचा 'ब्रॅण्ड ऍम्बेसिडर' म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला आज महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

नुकत्याच पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धनने बाजी मारली. महाराष्ट्र केसरीच्या चांदीची गदा पहिल्यांदाच नाशिकला मिळाली.  नाशिक जिल्ह्याला प्रथमच महाराष्ट्र केसरीचा मान मिळाल्याने पालकसंस्था म्हणून महापालिकेच्या वतीने त्याचा यथोचीत गौरव व्हावा, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासह कॉंग्रेस गटनेते शाहु खैरे, माजी नगरसेवक संजय चव्हाण यांनी केली होती.  

त्या अनुशंगाने स्थायी समितीमध्ये आज झालेल्या बैठकीत त्याच्या  अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. महापालिकेच्या वतीने हर्षवर्धनचा गौरव करण्याबरोबरचं त्याची 'ब्रॅण्ड ऍम्बेसिडर' म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. यापुर्वी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतचा गौरव करुन महापालिकेने तिची 'ब्रॅण्ड ऍम्बेसिडर' म्हणून नियुक्‍ती केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख