harshwardhan patil photoframe removed in congress house | Sarkarnama

मुंबईत प्रवेश होताच पुण्यात फोटो हटवला!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

पुणे: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याची बातमी आल्यावर पुण्यातील काँग्रेस भवनात असलेला त्यांचा फोटो कार्यकर्त्यांनी हटवला आहे.

पुणे: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याची बातमी आल्यावर पुण्यातील काँग्रेस भवनात असलेला त्यांचा फोटो कार्यकर्त्यांनी हटवला आहे.

यासंबंधाने एका युवक कार्यकर्त्यांने स्वतःच्या फेसबुक वॉलवर हा फोटो पोस्ट करत 'काँग्रेस भवन' एवढीच प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील काँग्रेसचे बडे नेते असा लौकिक असणारे हर्षवर्धन पाटील यांनी आज काँग्रेसचा त्याग करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर पुण्याच्या काँग्रेस कार्यालयातील त्यांचा फोटो गॅलरीत आणून ठेवला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख