हर्षवर्धन पाटील प्रदेश काॅंग्रेसच्या धोरण समितीचे अध्यक्ष

हर्षवर्धन पाटील प्रदेश काॅंग्रेसच्या धोरण समितीचे अध्यक्ष

इंदापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  पाटील यांची पक्षाच्या महत्वाच्या राज्य धोरण ( स्ट्रॅटेजी ) समितीच्या समन्वयक पदी निवड झाली. अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीचे सहसचिव खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी 14 जुलै रोजी राञी नवी दिल्ली येथे ही घोषणा केली.

पक्षाने नवीन प्रदेशाध्यक्ष आणि पाच कार्याध्यक्ष नेमल्यानंतर इतर नेत्यांनाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्याचे ठरविलेले आहे. त्यानुसार पाटील यांची धोरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच प्रचार समिती वर देखील त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. 

हर्षवर्धन पाटील यांना कनिष्ठ असणाऱ्या अनेक नेत्यांची चांगल्या पदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे पाटील यांच्यावर अन्याय झाल्याची भावना काही कार्यकर्त्यामध्ये आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com