हर्षवर्धन पाटलांनी पाळला दिलेला शब्द! इंदापुरात सुळेंना विक्रमी मताधिक्य!

हर्षवर्धन पाटलांनी पाळला दिलेला शब्द! इंदापुरात सुळेंना विक्रमी मताधिक्य!

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काॅग्रेस व कॉग्रेस पक्षाने एकादिलाने काम केल्यामुळे तालुक्यातून खासदार सुप्रिया सुळे यांना ७१ हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्यामुळे भाजपचे विजयाचे मनसुबे धुळीस मिळाले.

भोेर विधानसभा मतदारसंघातील दोन्ही काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील वाद लोकसभेचे मतदान झाल्यानंतर उफाळून आले. तेथे आमदार संग्राम थोपटे यांनी सुळे यांचे कामच केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केला होता. त्या तुलनेत इंदापुरात काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून साथ दिल्याचे दिसून येत आहे. 

इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्वत:चे अस्तित्त्व नगण्य आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपच्या उमेदवारची अनामत रक्कम जप्त झाली हाेती.

भाजपच्या लोकसभेच्या  उमेदवार कांचन राहुल कुल यांच्या विजयासाठी भाजपने इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षातील नाराज कार्यकर्त्यावर लक्ष केंद्रित केले होते व त्यांना गळाला लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यामध्ये सांगता सभा घेवून राजकीय वातावरण तापवले. मात्र इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने जोमाने काम केले.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर प्रचारामध्ये सहभागी होवून `झाले गेले विसरुन` जाण्याचा  कार्यकर्त्यांना संदेश देवून खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारामध्ये सहभागी होण्याचा आदेश दिला.

राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर ,पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गावेच्या गावे पिंजून काढून सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन दिले. या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद देवून खासदार  सुळे यांना तालुक्यातुन प्रथमचे ७१ हजार पेक्षा जास्त मताधिक्य दिले. हे मताधिक्य २०१४ च्या निवडणूकीपेक्षा तिपटीने आहे. राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या एकदिलामुळे तालुक्यामध्ये हाच चमत्कार घडला असून खासदार सुप्रिया सुळेंचा निर्विवाद विजय झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com