इंदापूरची जागा काॅंग्रेसला मिळणार असल्याचे सांगत हर्षवर्धन यांनी वाढविले भरणेंचे टेन्शन!

इंदापूरची जागा काॅंग्रेसला मिळणार असल्याचे सांगत हर्षवर्धन यांनी वाढविले भरणेंचे टेन्शन!

वालचंदनगर : आपण काॅंग्रेसमध्येच राहणार असून इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा काॅंग्रेसला मिळवून देण्याची जबाबदारी काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः घेतलली असल्याचे सांगत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांचे टेन्शन वाढविले आहे.

दोन्ही काॅंग्रेसच्या जागावाटपात इंदापूरचा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काॅंग्रेसकडेच राहणार असल्याच्या धास्तीने पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अर्थात त्याला कारणही तसेच होते.  गेल्या वर्षी ३० एप्रिल २०१८ रोजी इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावामध्ये झालेल्या शेतकरी मेळामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाटेल ते झाले तरीही इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे सांगितल्याने ही जागा वादाची ठरली. यावर तोडगा म्हणून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली.

पाटील हे आज कामानिमित्त चेन्नईमध्ये गेले आहेत. त्यांनी फोनवरुन  भाजप प्रवेशाच्या बातमीमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगून मी कॉग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे नाही. मी कॉग्रेसमध्ये असून इंदापूरच्या विधानसभेच्या उमेदवारीसंदर्भात कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून त्याची जबाबदारी त्यांनी घेतली असल्यामुळे विधानसभेच्या जागेच्या तिकिटाची चिंता नाही.

``लोकसभेला दोन्ही काॅंग्रेस पक्षाची आघाडी आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही आघाडी होणार असून इंदापूरची जागा कॉग्रेस मिळणार आहे. कदाचित राहुल गांधी यांचे मित्र पक्षाशी बोलणे झाले  असून  इंदापूरच्या जागेसंदर्भात  काही अडचण असेल, असे मला वाटत नाही.  राहुल गांधी यांच्यावर पूर्ण विश्‍वास असल्याचे सांगून भाजप प्रवेश करणार नाही,`` असे त्यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. 

त्यांनी इंदापूरची जागा मिळण्याबाबत आत्मविश्वास व्यक्त केल्याने साहजिकच भरणे यांचे टेन्शन वाढले आहे. भरणे यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी आधीपासूनच नेम धरला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com