अखेर हर्षवर्धन पाटलांचे ठरले...मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजप प्रवेश

अखेर हर्षवर्धन पाटलांचे ठरले...मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजप प्रवेश

वालचंदनगर : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा उद्या भाजप प्रवेश होत आहे. गणेश विसर्जन होण्याआधीच  इंदापूर तालुक्यतील कॉंग्रेस त्यामुळे विसर्जित होणार आहे. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्याची तयारी सुरु केली आहे.

पाटील यांनी गेल्या आठवड्यामध्ये बुधवार(ता.४) रोजी पुढील राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी  जनसंकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये जनतेने पाटील यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला होता. मेळाव्यानंतर दोन दिवस नॉट रिचेबल  असलेले पाटील  थेट ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करताना दिसले. त्यानंतर ते इंदापूर तालुक्यामध्ये आल्यानंतर पुढील दिशेबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी वेट अॅन्ड वॉच असे सांगितले.

आता पाटील यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्षा संपली असून दुपारी तीन वाजता हा प्रवेश होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी  बुधवारी मुंबईला जाण्याची जयत्त तयारी सुरु केली आहे. इंदापूर तालुक्यातील सध्याचे कॉग्रेसचे कार्यकर्ते हे हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते असून कॉग्रेसचे सर्व कार्यकर्ते पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com