हर्षवर्धन पाटील यांचे चार सप्टेंबरला ठरणार....काॅंग्रेसमध्ये राहायचं की भाजपत जायचं?

हर्षवर्धन पाटील यांचे चार सप्टेंबरला ठरणार....काॅंग्रेसमध्ये राहायचं की भाजपत जायचं?

वालचंदनगर : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येत्या बुधवारी (ता.४) रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन केले. मेळाव्यामध्ये 
आगामी निवडणुकीच्या राजकारणाची दिशा ठरणार असल्याने पाटील यांच्या मेळाव्याकडे तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

पाटील यांनी गेल्या महिनाभरामध्ये इंदापूर तालुक्यातील  जिल्हा परिषद-पंचायत समिती गणानूसार गावभेटी करुन गावकऱ्यांशी संवाद साधला होता.

नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाच वर्षामध्ये पाणी मिळाले नसल्यामुळे झालेले नुकसान, तालुक्याची झालेली अधोगती, युवकांची वाढलेली बेरोजगारी, प्रशासनावरती वचक नसल्यामुळे भरडत चालेले सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा मांडून तालुक्यात परिवर्तन करण्याची गरज असल्याचे ठासून सांगितले.

गावोगावी कार्यकर्त्यांनी विधानसभेचा निर्णय घेण्याची मागणी केली होती. जनता सांगेल त्या पक्षातून निवडणूक लढविणार असल्याचे पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये  राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्षाची आघाडी तुटल्यामुळे दोन्ही कॉग्रेस स्वतंत्र लढले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे आमदार झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये राज्यात दोन्ही कॉग्रेसची पुन्हा आघाडी झाली व इंदापूरमधून खासदार सुप्रिया सुळे यांनी ७० हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले. सुळे यांच्या विजयामध्ये हर्षवर्धन पाटलांचा मोलाचा वाटा आहे. विधानसभेलाही दोन्ही कॉग्रेसची आघाडी होण्याची शक्यता असून इंदापूरच्या जागेचा पेच निर्माण होणार आहे. लोकसभेला आम्ही आघाडीचा धर्म पाळला असून राष्ट्रवादी कॉग्रेसने विधानसभेला आघाडीचा धर्म पाळावा असे जाहीरपणे सांगितले होते.

जुलै महिन्याच्या अखेरीस हर्षवर्धन पाटील यांनी विधानगाथा पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे  राज्यामध्ये पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. यापूर्वी पाटील यांनी १२ ऑगस्ट रोजी मेळावा घेण्याचे जाहिर केले होते. मात्र अचानक मेळाव्याच्या तारखेमध्ये बदल आला. बुधवार (ता.४) सप्टेंबर रोजी इंदापूरमध्ये कार्यकर्त्याचा मेळावा असून हर्षवर्धन पाटील  जनतेला विचारुन राजकारणाची दिशा ठरविणार असल्याची चर्चा सुरु असून पाटील काय भूमिका घेणार याकडे  इंदापूर तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com