इंदापूरच्या शेजारच्या दादावर हर्षवर्धन पाटील यांची टीका

इंदापूरच्या शेजारच्या दादावर हर्षवर्धन पाटील यांची टीका

इंदापूर : काँग्रेसने वाऱ्यावर सोडले तर राष्ट्रवादी काँग्रेसने फसविले. मात्र आपण तालुक्याच्या हितासाठी विश्वव्यापी नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेन्द्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात आलो असून फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यास पाणी देण्याचा शब्द खरा करून दाखवला आहे. त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवारास विजयी करून इतिहासाचे साक्षीदार व्हा असे आवाहन माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

शहरातील श्रीराम वेस येथून हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत पदयात्रा सुरू होऊन मुख्य बाजार पेठ मार्गे पदयात्रेचा समारोप 100 फुटी रस्त्यावर ज्येष्ठ नागरिक संघाजवळील मैदानावर विराट जाहीर सभेत झाला. भाजपाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचेसरचिटणीस रणजित वाघमोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाजपात प्रवेश केला. यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

श्री पाटील पुढे म्हणाले, लोकसभेत आमची मदत घेतली मात्र विधानसभा लागली की राष्ट्रवादीने नेहमी प्रमाणे फसवले. काँग्रेसने देखील साथ न दिल्याने जनतेच्या हितासाठी भाजपात प्रवेश केला. आता एक सोडून शेजारचे सर्व दादा आपल्या सोबत आहेत. त्यामुळे चिंता नाही. मात्र शेजारच्या दादाची काय अवस्था झाली आहे. तो कधी पळतोय तर कधी रडतय. त्यामुळे आता काळजी करायची नाही.

सन 2014 च्या पराजयचा वचपा काढायचा आहे. त्यामुळे आता काठावर पास नको तर विधानसभेत पहिल्या बाकावर बसण्यासाठी विक्रमी मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

विरोधी पक्षाचा आमदार असून देखील 1300 कोटी रुपये तालुक्याच्या विकासासाठी आणले असे आमदार म्हणतात मात्र हे पैसे फ्लेक्स लावण्या पुरतेच आले. निरा, भीमा व खडकवसल्याचे पाणी न आल्यामुळे तालुक्याचे दरवर्षी सुमारे 2500 कोटी रुपयांचे नुकसान झाले.त्यामुळे सर्वांचा प्रपंच धोक्यात आला. त्यामुळे निष्क्रिय लोकप्रतिनिधीस दारी धरायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शिक्षण, शेती, शेती प्रक्रिया उद्योगास पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली.

सुत्रसंचलन ऍड कृष्णाजी यादव यांनी केले.यावेळी मारूतराव वणवे, सदानंद शिरदाळे, अतुल तेरखे- डकर, मुकुंद शहा, ऋतुजा पाटील, डॉ. अश्विनी ठोंबरे, मयूरसिंह पाटील, भरत शहा, मंगेश पाटील, सुभाष काळे, सुभाष बोगांणे, महेंद्र रेडके, गजानन वाकसे, माऊली वाघमोडे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com