अजितदादांना हर्षवर्धन म्हणतात, स्वतःचे ठेवायचे झाकून आणि....

अजितदादांना हर्षवर्धन म्हणतात, स्वतःचे ठेवायचे झाकून आणि....

वालचंदनगर : राज्यात 2014 च्या विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने न मागता भाजपला का पाठिंबा दिला ? पाठिंब्याच्या मागे काय स्वार्थ होता... रात्री अपरात्री मुख्यमंत्र्याना कोण भेटते? स्वत:चे ठेवायचे झाकून अन् .... या भाषेमध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उडवली.

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेमध्ये बोलत होते.अजित पवार यांनी शुक्रवार (ता.18) रोजी बावड्यामध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील स्वार्थासाठी भाजपमध्ये गेले असल्याची टीका केली होती. या टीकेला पाटील यांनी उत्तर दिले.

पाटील म्हणाले की, स्वार्थ कुणाला आहे. 2014 साली न मागता भाजप सरकारला पाठिंबा काेणी दिला ? मी सर्वांच्या समक्ष भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र काहीजण रात्री-अपरात्री मुख्यमंत्र्याना भेटत असतात. सध्या ते भाषणामध्ये माजी विलासराव देशमुख्य 40 हजार मतांनी पडले होते व नंतर 80 हजार मतांनी विजयी होवून मुख्यमंत्री झाले असल्याचे सांगत असल्याने यात मुख्यमंत्री कोणाला व्हायचे आहे. निवडणूकीमध्ये काय होणार आहे?

``अजित पवार यांचा इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व नीरा भिमा सहकारी साखर कारखान्यावर डोळा आहे. हे कारखाने बंद पाडायचे व सर्व उस अंबालिका कारखान्याला नेण्याचा डाव आहे. भाषणामध्ये `सोमेश्‍वर`ने एवढा दर असल्याचे सांगत असतात.मात्र ज्या कारखान्याला स्वत:चा (अजित पवार) यांचा ऊस जातो. त्या कारखान्याने किती दर हे सांगावे. बारामतीचे सुत गिरणी का बंद पडली? स्वत:चे ठेवायचे झाकून अन्..,``या भाषेमध्ये अजित पवारावर टीकेचे झोड उडावली. 
वालचंदनगर कंपनीमधील कामगारांचा, शेती महामंडळातील कामगारांचा तसेच वालचंदनगर गावठाचा प्रश्‍न मार्गी लावणार आहे. इंदापूरच्या पाणी प्रश्‍न,बेरोजगारी, युवकांच्या प्रश्‍न शेतीच्या प्रश्‍नासाठी भाजपच्या कमळाच्या पुढचे बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.

निष्क्रिय आमदाराला घरी बसवा : पाटील
राज्यामध्ये 288 आमदार आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्याचा आमदार सर्वात जास्त निष्क्रिय आहे. पाच वर्षात 16 अधिवेशनामध्ये 6 प्रश्‍न विचारले.यातील एक प्रश्‍न मार्गी लावला नाही. शेतीच्या,पाण्याचा प्रश्‍नावर तोंड उघडले नाही.तालुक्यात एकही नवीन प्रकल्प आणता आला नसून अशा लबाड ढोंगी आमदारला घरी बसविण्याचे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी जंक्शनचे उद्योजक रामेश्‍वर माने,राजू पालीवाल, उद्धव माने, अंथुर्णेचे माजी उपसरपंच संजय वंचाळे यांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com