इंदापुरात सुळेंनाच आघाडी; माझा झेडपी गट अग्रभागी राहणार : हर्षवर्धन पाटील

इंदापुरात सुळेंनाच आघाडी; माझा झेडपी गट अग्रभागी राहणार : हर्षवर्धन पाटील

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळला असून खासदार सुप्रिया सुळे यांना जास्तीजास्त मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.  इंदापूर मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे यांना ४० ते ४५ हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळणार असून सर्वाधिक मताधिक्य बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषदेच्या गटातून मिळणार असल्याचा विश्‍वास माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष ताकदवान आहेत.  तालुक्याचे राजकारण माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यामध्येच फिरत असते. गेल्या वर्षी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस इंदापूरची जागा सोडणार नसल्याचे सांगून राज्यात आघाडी तुटली तरीही चालेले असे वक्तव्य केल्यामुळे इंदापूर तालुक्यातील कॉग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विरोधात होते. मात्र लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनोमिलन झाले.दोघांनी एकाच व्यासपीठावरुन खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले.

लाेकसभेची निवडणूक  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यामध्ये चुरशीची झाली. निवडणूकीमध्ये तालुक्यातील ६४.३९ टक्के  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  दोन्ही कॉंग्रेसने एकदिलाने काम केल्यामुळे तालुक्यातून खासदार सुप्रिया सुळे यांना १ लाखांचे मताधिक्य मिळणे अपेक्षित आहे. मात्र तालुक्यातील कॉंग्रेस ही भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. भाजपनेही  कॉंग्रेसच्या नाराज  गटावरती लक्ष केंद्रित केले होते. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेटून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले होते. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये घड्याळाला डावलून कमळ चालवल्याची चर्चा वेगाने सुरु आहे.

या संदर्भात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले की, तालुक्यातील कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आघाडीचा धर्म पाळला आहे. खासदार सुप्रियाताईंच्या मताधिक्यासाठी कॉंग्रेस पक्षाने मेळावे,बैठका, जाहीर सभा घेतल्या. प्रत्येक कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. कॉग्रेसच्या कामामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना ४० ते ४५ हजारांचे  मताधिक्य मिळणार आहे. विरोधक केवळ चर्चा करीत असतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसते. दिलेला शब्द पाळण्याची कॉग्रेसची पंरपरा आहे. इंदापूर, भोर व पुरंदर तालुक्यातुन खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळणार असून विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com