इंदापूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध : हर्षवर्धन पाटील

इंदापूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : इंदापूर शहर व तालुक्यात सर्वधर्मसमभाव केंद्रबिंदू मानून आपण जातीय सलोखा ठेवून सकारात्मक काम केले. नगरपरिषदेवर विरोधकांनी केलेले कोट्यावधी रुपयांचे कर्ज फेडून नगरपरिषदेनेस्वछता अभियानात देशात दहावा क्रमांक पटकावला. त्यामुळे शहर स्वच्छ, सुंदर व हरित बनवण्यास प्राधान्य असून शहराचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध आहे, असा विश्वास महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

केंद्र व राज्यातील सत्तेचा फायदा शहरास मिळवून देऊन शहर ऐतिहासिकत्वाचे संवर्धन करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारास प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले.

इंदापूर विधानसभा भारतीय जनता पार्टी,शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष ( आठवले गट ), शिवसंग्राम, रयत क्रांती शेतकरी संघटना या महायुतीच्या वतीने शहर दर्गा मशीद चौकात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले, कर्मयोगी शंकरराव पाटील, कै. राजेंद्रकुमार घोलप यांच्या समवेत  गोकुळदास शहा, गुंडेकर काका, डॉ. हेगडे, गणपतदास शहा यांनी सहकार, शिक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिल्याने आर्थिक विकास झाला. सर्वांच्या विकासकारणांच्या तत्वाप्रमाणे तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझ्याकडे आली. त्यामुळे आपल्या उज्वल भवितव्याकरिता, शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच केंद्र व राज्याच्या सहकार्याने व मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून हे काम यशस्वीपणे करण्यासाठी महायुतीस विक्रमी मताधिक्याने विजयी करा.

तालुक्याचा सन्मान वाढवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. विरोधक जाणूनबुजून जातीपतीचे राजकारण करत आहेत. कारण त्यांच्याकडे विकासाचे कुठलेही मुद्देनसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे महायुतीस मत म्हणजे तालुक्याच्या सर्वांगीण विकासास मत होय. महायुतीचा तालुक्यातील पहिला आमदार विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कैलास कदम, शकिलभाई सय्यद, संदीपान कडवळे, अफसर मोमीन, पांडुरंग शिंदे,  आसिफ बागवान, महादेव सोमवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रचारप्रमुख ॲड. कृष्णाजी यादव, माऊली चवरे, नानासाहेब शेंडे, विशाल बोन्द्रे, मुकुंद शहा, भरत शहा, अशोक इजगुडे, माऊली वाघमोडे, माऊली चवरे, धनंजय पाटील, रघुनाथ राऊत, जगदीश मोहिते, शेखर पाटील, गुड्डू मोमीन, जगदीश मोहिते आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com