हर्षवर्धन यांनी विचारलं पुढं काय करायचं? लोक म्हणाले भाजप!

हर्षवर्धन यांनी विचारलं पुढं काय करायचं? लोक म्हणाले भाजप!

पुणे : भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हे शब्दाला जागणारे होते. आपल्या शेजारच्या वृत्तीसारखे नव्हते. राष्ट्रवादीने माझा उपयोग करून घेतला. मला फसवलं गेलं. अपमान केला गेला. यापुढे माझा आक्रमकपणा बघाल, अशा शब्दांत काॅंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला.

पुढं काय करायचं, असं हर्षवर्धन यांनी समोरच्या गर्दीला विचारल्यानंतर `भाजप`, असे उत्तर आले. लोकांच्या मनात आहे, तेच होईल काळजी करू नका, अशी घोषणा त्यांनी येथे केली. तुमच्या भावनेचा शंभर टक्के आदर करू, असे त्यांनी सांगितले. स्वतः भाजप प्रवेशाची अधिकृत प्रवेशाची घोषणा करण्याचे त्यांनी टाळले. पण राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले.

इंदापूरची जागा ही त्यांच्यासाठी न सोडता राष्ट्रवादी स्वतःकडेच ठेवणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आज निर्धार मेळावा घेतला. त्यात राष्ट्रवादीवर शरसंधान साधले.

``राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा नियोजनात नव्हती; मग इंदापुरात कशी आल?राष्ट्रवादीने तुमचं आमचं वाटोळं केलं कुणाचीही भीती नाही. ही लढाई आता आरपारची आहे. वाघ म्हटलं तरी खातंय आणि वाघोबा म्हटलं तरी खातंय. लबाड आणि फसवेगिरी करणारांसाठी आता काम करायचं नाही. लोकसभेसाठी मला भाजपने आग्रह केला होता. पण मी राष्ट्रवादीला साथ दिली. राज्यात देशात काय हवा चाललीय, वेगळं सांगायला नको. राज्यात देशात काय हवा चाललीय, वेगळं सांगायला नको. राज्यात देशात काय हवा चाललीय, वेगळं सांगायला नको, असे म्हणत आपला मार्ग सांगितला. प्रत्यक्षात निर्णय घेतला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com