धमाका करण्याआधी हर्षवर्धन यांना विजयदादांचे `मार्गदर्शन`: दोन्ही पाटील दोन काॅंग्रेसच्या विरोधात

harshwardhan meets vijaydada
harshwardhan meets vijaydada

वालचंदनगर : राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (बुधवार, ता. ४) सकाळी  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहित पाटील यांची भेट घेवून बंद खोलीमध्ये चर्चा केली. दोन्ही पाटलांच्या चर्चेमुळे  हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश निश्‍चित मानला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोन्ही पाटील काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत.

 हर्षवर्धन पाटील  यांनी आज दुपारी एक वाजता कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांची चर्चा करुन राजकारणाची पुढील दिशा ठरविणार आहेत.

मंगळवारी (ता.३) रोजी रात्री राष्ट्रवादी व कॉग्रेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये भोर,पुरंदर व जुन्नर विधानसभा मतदार संघ कॉग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी कॉग्रेस अनुकूल आहे. मात्र इंदापूरच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्या समर्थकांना समजून चुकले आहे. 

माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोेहितांचे चिरंजीव विजयसिंह सध्या भाजपमध्ये आहेते. हर्षवर्धन पाटील व विजयसिंह मोहितेपाटील यांचे निकटवर्तीय संबध असून हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश सुकर व्हावा यासाठी विजयदादा प्रयत्नशील आहेत. मोहिते पाटलांचा इंदापूर तालुक्यातील जनतेशी दांडगा जनसंपर्क आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांची विजयसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतली होती. तेव्हाच भाजपला सहकार्य करण्यासाठी विजयदादा हर्षवर्धन यांना सांगत होते, असे त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले. 

आता इंदापूरची जागा हर्षवर्धन यांच्यासाठी सोडण्यास राष्ट्रवादी तयार नसल्याने त्यांना आज निर्णय घेणे अवश्य झाले आहे. आजच्या मेळाव्यात पाटील अपक्ष उमेदवार की भाजपच्या चिन्हावर उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत घोषणा होणे अपेक्षित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com