महापालिका निवडणुकीत हर्षवर्धन जाधव तुम्हाला पुन्हा शहरातील रस्त्यांवर दिसेल - हर्षवर्धन जाधव

महापालिका निवडणुकीत हर्षवर्धन जाधव तुम्हाला पुन्हा शहरातील रस्त्यांवर दिसेल - हर्षवर्धन जाधव

शिवसेनेतून माझ्यासोबत मनसेत प्रवेश केलेले सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे यांचे शहरात मोठे काम आहे त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता महापालिका निवडणुकीत याचा नक्कीच मनसेला फायदा होईल मी त्यांच्या नेतृत्वाखाली देखील काम करण्यास तयार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले

औरंगाबाद : मनसेत प्रवेश केल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाकडून माझ्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या रस्त्यांवर, गल्लोगल्ली आणि घरोघरी हर्षवर्धन जाधव पुन्हा फिरतांना तुम्हाला दिसेल अशी घोषणा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. सरकारनामाशी बोलताना हर्षवर्धन जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं खरं हिंदुत्व मनसेने स्वीकारलंय. मी यापूर्वी मनसेतच असल्यामुळे या पक्षाशी माझी असलेली नाळ कायम होती. शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडल्यामुळे महाराष्ट्र पोरका झाला होता, ही पोकळी राज ठाकरे यांनी खरं हिंदुत्व स्वीकारून भरून काढली . 

माझ्यासारख्या आक्रमक व्यक्तीला साजेशी अशी ही भूमिका असल्याने मी पुन्हा मनसेत जाण्याचा निर्णय घेतला. आता पक्ष माझ्यावर जी जबाबदारी टाकेल ती मी रात्रंदिवस एक करून पार पाडेन असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महापालिका निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी लवकरच औरंगाबादेत येत आहेत. त्यावेळी माझ्यासाठी जी भूमिका ठरवली जाईल ती पूर्णपणे, जबाबदारीने पार पाडण्यात मी कुठलीही कसूर ठेवणार नाही .रात्रंदिवस एक करून महापालिकेत मनसेचा भगवा फडकवण्यासाठी मी काम करण्यास तयार आहे. 

शिवसेनेतून माझ्यासोबत मनसेत प्रवेश केलेले सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे यांचे शहरात मोठे काम आहे त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता महापालिका निवडणुकीत याचा नक्कीच मनसेला फायदा होईल मी त्यांच्या नेतृत्वाखाली देखील काम करण्यास तयार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले 

शिवसेनेच्या नेत्यांनी माझा काटा काढला 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कन्नडला माझ्या वडिलांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आले होते. मी त्यांच्या जवळ जाण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मला कधी त्यांच्याजवळ जाऊ दिले नाही. त्यामुळे मी पक्षाशी समरस होऊ शकलो नाही. चंद्रकांत खैरे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी नेहमीच माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला .त्यामुळे मी शिवसेनेत असूनही पक्षाशी कधीहीे एकरूप नव्हतो या आरोपात तथ्य नसल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com