मनसेच्या महामोर्चाला हर्षवर्धन जाधव यांची दांडी

पक्षाचा झेंडा आणि भूमिका बदलल्यानंतर मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. औरंगाबादेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षात घरवापसी केली, तर शिवसेनेच्या एका महत्वाच्या पदाधिकाऱ्याने राज ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी (ता.8) मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे व मनसेचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी मुंबईतील मोर्चाच्या नियोजनात व्यस्त असतांना कृष्णकुंजवर जाधव यांचा प्रवेश करून घेण्यात आला.
मनसेच्या महामोर्चाला हर्षवर्धन जाधव यांची दांडी

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मनसे प्रवेशाला चोवीस तास उलटत नाही तोच त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महामोर्चाला दांडी मारल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात आज मनसेच्या वतीने मुंबईत भर उन्हात महामोर्चा काढण्यात आला होता. स्वतः राज ठाकरे चालत मोर्चात सहभागी झाले होते. परंतु पक्षात येऊन एकच दिवस झालेल्या हर्षवर्धन जाधव यांनी मात्र मोर्चाकडे पाठ फिरवली. 

पक्षाचा झेंडा आणि भूमिका बदलल्यानंतर मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. औरंगाबादेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षात घरवापसी केली, तर शिवसेनेच्या एका महत्वाच्या पदाधिकाऱ्याने राज ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी (ता.8) मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे व मनसेचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी मुंबईतील मोर्चाच्या नियोजनात व्यस्त असतांना कृष्णकुंजवर जाधव यांचा प्रवेश करून घेण्यात आला. त्यामुळे आजच्या महामोर्चात हर्षवर्धन जाधव आपल्या समर्थकांसह सहभागी होतील असे वाटले होते. प्रत्यक्षात जाधव यांनी मनसेचे सर्वात मोठे शक्तीप्रदर्शन ठरलेल्या महामोर्चाला दांडी मारल्याचे समोर आले आहे. 

माझी दाढ दुखत होती.. 
मोर्चात सहभागी न होण्याचे कारण जाणून घेण्यासाठी सरकारनामा प्रतिनिधीने हर्षवर्धन जाधव यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा, "माझी दाढ दुखत असल्यामुळे मी मोर्चात सहभागी होऊ शकलो नाही' असे जाधव यांनी स्पष्ट केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com