मराठा राजकीय पक्ष स्थापन झाल्यास मी कार्यकर्ता म्हणून काम करीन - हर्षवर्धन जाधव

 मराठा राजकीय पक्ष स्थापन झाल्यास मी कार्यकर्ता म्हणून काम करीन - हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात आणि राज्यभरात रोज कुठे न कुठे आत्महत्या होतेय. चिकलठाण्यात काल एका तरुणाने जीव दिला. तरी कुठलाच राजकीय पक्ष काही करायला तयार नाही. त्यामुळे उद्वेगातूनच मी नवा मराठा राजकीय पक्ष स्थापन करण्याची भूमिका मांडली होती. पण मला नेतृत्व करायचय म्हणून मी अशा प्रकारची मागणी करत असल्याचा काहीजणांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी सांगू इच्छितो मला नेतृत्व करायचे नाही, पक्ष स्थापन झाला तर मी कार्यकर्ता म्हणूनच काम करीन अशी ग्वाही आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली. 

मुंबईत पक्षाची बैठक, मंत्रालयाजवळ ठिय्या आंदोलन आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर "मराठा आरक्षणावर बोलू नका' असा आरोप करत खळबळ उडवून दिल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादेत येताच नवा पक्ष स्थापन करण्याची मागणी केली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांतीचौक येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपले मत मांडले होते. दुसऱ्या दिवशी जालना येथील मराठा आंदोलकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी गेले असता तिथेही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मराठ्यांनी नवा राजकीय पक्ष काढावा या आपल्या विधानाचा पुनरूच्चार केला होता. त्यांच्या या भूमिकेला काही मराठा संघटना व आंदोलकांनी विरोध दर्शवला. 

काहींनी हर्षवर्धन जाधव यांना नेतृत्व करायचे आहे म्हणूनच त्यांनी अशा प्रकारची मागणी केल्याची टीका करत त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात येऊन राजकीय भूमिका मांडू नये, स्वंतत्रपणे इतर ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त करावे अशा शब्दांत सुनावले होते. यावर हर्षवर्धन जाधव यांनी आज स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या मागणीमागे माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही. ओबीसी, एससी, एसटी, धनगर, मुस्लिम समाजाला सोबत घेऊन त्यांच्या 52 टक्के आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता अधिकचे 16 टक्के मराठा आरक्षण मिळावे ही माझी भूमिका आहे. 

इतर राजकीय पक्ष मराठा आरक्षणासंदर्भात कुठलीच ठोस भूमिका घेत नाहीयेत, इकडे रोज मराठा तरुण आत्महत्या करतायेत तेव्हा मराठ्यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष असला पाहिजे असे मत मी मांडले होते आणि मी आजही त्यावर ठाम आहे. या मागणी मागे माझा वैयक्तिक स्वार्थ किंवा नेतृत्व करण्याची इच्छा नाही. असा एखादा राजकीय पक्ष स्थापन झाला तर मी त्यात कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com