आधी संभाजीनगर करा मगच महापालिकेसाठी मत मागा : हर्षवर्धन जाधव 

महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी हर्षवर्धन जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेला आव्हान दिले आहे
Harshwardhan Jadhav Warns Chandrakant Khaire Again
Harshwardhan Jadhav Warns Chandrakant Khaire Again

औरंगाबाद : गेली अनेक वर्ष औरंगाबादचे संभाजीनगर करणार या एकाच मुद्द्यावर शिवसेनेने आपली राजकीय पोळी भाजून घेतली , आता पुन्हा संभाजीनगर आणि हिंदू-मुस्लीमच्या मुद्द्यावर शिवसेना महापालिका निवडणूक लढू पाहत आहे. शिवसेनेने आधी आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे आणि मगच लोकांना मते मागावी, अन्यथा आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा शब्दात माजी आमदार तथा मनसेचे स्थानिक नेते हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी हर्षवर्धन जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेला आव्हान दिले आहे. हर्षवर्धन जाधव यांनी नुकताच मनसेत प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्यावर आगामी महापालिका निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात बंडखोरी करत हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या पराभवाला मोठा हातभार लावला होता. त्यानंतर आता पुन्हा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला अंगावर घेतले आहे.

जाधव म्हणाले, ''शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी आता जनतेची दिशाभूल करण्याचे काम बंद करावे. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करणाऱ्या शिवसेनेने अद्याप या शहराचे अधिकृत नामकरण केलेले नाही .आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही क्षणी संभाजीनगरची घोषणा करतील असे सांगत आहेत. माझे त्यांना आव्हान आहे की,  दोन महिन्याच्या आत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे आणि त्यानंतरच लोकांकडे मत मागावीत अन्यथा आम्ही त्यांना प्रचारासाठी शहरात फिरू देणार नाही.'' एकंदरीत मनसेने लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरलरले हर्षवर्धन जाधव अस्त्र महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात पुन्हा वापरण्याचे ठरवले आहे असे दिसते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com